मराठवाड्यात पावसामुळे पिकांना संजिवनी; नुकसानही

औरंगाबाद :मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यातील २६१ मंडळांत मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली.
Rains revive crops in Marathwada
Rains revive crops in Marathwada

औरंगाबाद :मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यातील २६१ मंडळांत मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील दोन व जालना, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळांत अतिपाऊस झाला. काही भागात हा पाऊस पिकांना नवसंजिवनी देणारा, तर काही ठिकाणी नुकसानकारक ठरला.

प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोमवारपासून पुन्हा एकदा परतीच्या वाटेवरील पाऊस मराठवाड्यात सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी लातूर जिल्ह्यातील ५४ मंडळांत पाऊस झाला. त्यापैकी २३ मंडळांत मध्यम ते दमदार, तर बेलकुंड व लामजना या दोन मंडळात अतिपाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४२ मंडळांत पाऊस झाला. सातोना मंडळात त्याने जोरदार हजेरी लावली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ६० मंडळांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ मंडळांत पावसाची हजेरी लागली. आष्टी मंडळात अति, तर ३९ मंडळांत मध्यम ते दमदार पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ मंडळातं तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला.

जिल्हानिहाय पाऊस आणि मंडळे (२५ मि.मीपुढे)

लातूर जिल्हा ः लातूर ५६.३, बाबळगाव ५२.८, हरंगुळ  ५८.५, कासारखेडा ५५.३, गातेगाव २९.८ , तांदुळजा ३८.३, चिंचोली ३९.३, कान्हेरी ६४.८, औसा ३७.३, मातोळा २६, भादा ३४.३.

जालना जिल्हा ः जालना ग्रामीण ३६.३, परतुर २७, आष्टी ४९.३, शेळगाव ३०.८, आंतरवली ३०,रांजणी ५३.८.

औरंगाबाद जिल्हा ः औरंगाबाद ५०.८, शिऊर ४९.८, लासुरगाव २५.५, वेरूळ ४० .८.

बीड जिल्हा ः बीड २९.३, पाली ३२.५ , म्हसाजवळा २७.३, नाळवंडी २७.५, पिंपळनेर २५.८, पेडगाव ३१, पाटोदा ३०, दासखेड ४०.८, थेरला २७.३, अमळनेर ३५.५, पिंपळा २७.३, जातेगाव २७, चकलांबा ३१, सिरसदेवी २८.५, पाटोदा ४४.३, लोखंडी सावरगाव ६२, घाटनांदुर ३५.८, बर्दापूर ४२.८, केज २७.५, होळ ३१.३, विडा ४७.५, शिरसाळा ४७.३, पिंपळगाव २५.

उस्मानाबाद जिल्हा ः मानकेश्वर ४७.५, येरमाळा ४७.१, डाळिंब ३२.

अतिपावसाची मंडळे (मि.मी)

बेलकुंड   ६९.५
लामजना ६८ 
सातोना ७२.८
आष्टी ६८.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com