कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता,
ताज्या घडामोडी
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणीत पावसाचा ‘खोडा’
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याच्या वेळेसच पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम वेगाने पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नाला धक्का बसला आहे. सोमवारी (ता.२) सायंकाळनंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी (ता.३) सकाळपर्यंत सुरूच राहिला. त्यामुळे अनेक कारखान्यांना ऊसतोडणी बंद ठेवावी लागल्याची स्थिती आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याच्या वेळेसच पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम वेगाने पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नाला धक्का बसला आहे. सोमवारी (ता.२) सायंकाळनंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी (ता.३) सकाळपर्यंत सुरूच राहिला. त्यामुळे अनेक कारखान्यांना ऊसतोडणी बंद ठेवावी लागल्याची स्थिती आहे.
पावसाचा जोर फारसा नसला, तरी ऊसतोडणीची वाहने अडकण्याची भीती निर्माण झाल्याने सावधगिरी म्हणूनही कारखान्यांनी तोडणी सुरू ठेवली नाही. यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर तोडणी बंदच राहिली. काहींनी रस्त्याशेजारी असणाऱ्या फडाची तोडणी सुरू करण्यास प्राधान्य दिले.
यंदाचा हंगाम साखर कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. यंदा महापुरामुळे उत्पादनात घट अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर ऊस हंगाम डिसेंबर महिना सुरू झाला, तरी गतीने सुरू झाला नाही. गेल्या चार दिवसांत बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले. आता हळूहळू तोडणीस गती येइल, ही अपेक्षा होती. पहिल्यांदा पूर बुडीत उस तोडावा लागत असल्याने कारखानदारांत नाराजी आहे.
हा ऊस तोडल्यास रिकव्हरी कमी येणार असल्याने चांगला व पूरबुडीत असा मिश्र ऊस तोडून रिकव्हरीचे प्रमाण कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या नियोजनात असतानाच सोमवारी दिवसभर पूर्ण ढगाळ हवामान राहिले. त्यातच सायंकाळनंतर हलक्या सरी झाल्याने तोडणीचे नियोजन बदलावे लागले.
मुहूर्ताच्या तोडी थांबल्या
अनेक ठिकाणी मुहूर्ताच्या तोडी सुरू होत्या. या पावसाने मात्र त्यालाही खोडा घातला. हलका पाऊस झाल्यास जमीन ओली होऊन ट्रक अथवा ट्रक्टर अडकण्याचा धोका असतो. ही वाहने अडकल्यास त्या वहानांना काढण्यासाठी दुसऱ्या वाहनांचा वापर करणे, उसाची चांगल्या रस्त्यापर्यंत वाहतूक करणे, या बऱ्याच खर्चिक बाबी असतात. यामुळे शेतकऱ्यालाही त्याचा मोठा भुर्दंड सोसावा लागतो. जोपर्यंत कडक ऊन पडत नाही, तोपर्यंत तोडणी अशक्य असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले.
- 1 of 584
- ››