Agriculture news in marathi rains stop cutting sugarcane in Kolhapur district | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणीत पावसाचा ‘खोडा’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याच्या वेळेसच पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम वेगाने पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नाला धक्का बसला आहे. सोमवारी (ता.२) सायंकाळनंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी (ता.३) सकाळपर्यंत सुरूच राहिला. त्यामुळे अनेक कारखान्यांना ऊसतोडणी बंद ठेवावी लागल्याची स्थिती आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याच्या वेळेसच पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम वेगाने पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नाला धक्का बसला आहे. सोमवारी (ता.२) सायंकाळनंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी (ता.३) सकाळपर्यंत सुरूच राहिला. त्यामुळे अनेक कारखान्यांना ऊसतोडणी बंद ठेवावी लागल्याची स्थिती आहे. 

पावसाचा जोर फारसा नसला, तरी ऊसतोडणीची वाहने अडकण्याची भीती निर्माण झाल्याने सावधगिरी म्हणूनही कारखान्यांनी तोडणी सुरू ठेवली नाही. यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर तोडणी बंदच राहिली. काहींनी रस्त्याशेजारी असणाऱ्या फडाची तोडणी सुरू करण्यास प्राधान्य दिले. 

यंदाचा हंगाम साखर कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. यंदा महापुरामुळे उत्पादनात घट अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर ऊस हंगाम डिसेंबर महिना सुरू झाला, तरी गतीने सुरू झाला नाही. गेल्या चार दिवसांत बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू  झाले. आता हळूहळू तोडणीस गती येइल, ही अपेक्षा होती. पहिल्यांदा पूर बुडीत उस तोडावा लागत असल्याने कारखानदारांत नाराजी आहे. 

हा ऊस तोडल्यास रिकव्हरी कमी येणार असल्याने चांगला व पूरबुडीत असा मिश्र ऊस तोडून रिकव्हरीचे प्रमाण कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या नियोजनात असतानाच सोमवारी दिवसभर पूर्ण ढगाळ हवामान राहिले. त्यातच सायंकाळनंतर हलक्‍या सरी झाल्याने तोडणीचे नियोजन बदलावे लागले. 

मुहूर्ताच्या तोडी थांबल्या

अनेक ठिकाणी मुहूर्ताच्या तोडी सुरू होत्या. या पावसाने मात्र त्यालाही खोडा घातला. हलका पाऊस झाल्यास जमीन ओली होऊन ट्रक अथवा ट्रक्‍टर अडकण्याचा धोका असतो. ही वाहने अडकल्यास त्या वहानांना काढण्यासाठी दुसऱ्या वाहनांचा वापर करणे, उसाची चांगल्या रस्त्यापर्यंत वाहतूक करणे, या बऱ्याच खर्चिक बाबी असतात. यामुळे शेतकऱ्यालाही त्याचा मोठा भुर्दंड सोसावा लागतो. जोपर्यंत कडक ऊन पडत नाही, तोपर्यंत तोडणी अशक्‍य असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...
नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...
आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
सिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...