Agriculture News in Marathi Rains threaten soybean, cotton growers | Page 2 ||| Agrowon

अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस उत्पादकांमध्ये धास्ती 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात बहुतांश तालुक्यात मागील दोन दिवसांत पाऊस झालेला आहे. अद्यापही पावसाचे वातावरण कायम असल्याने सोयाबीन काढणीला आलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात बहुतांश तालुक्यात मागील दोन दिवसांत पाऊस झालेला आहे. अद्यापही पावसाचे वातावरण कायम असल्याने सोयाबीन काढणीला आलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी करून ठेवली असून, पीक ओले होत असल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. गेल्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झालेली आहे. 

सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जूनच्या सुरुवातीला लागवड असलेले सोयाबीन काढणीस आलेले आहे. काही शेतकऱ्यांनी आताचा पाऊस सुरू होण्यापूर्वी सोयाबीन काढणीही केली. परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीसाठी तयार होत आहे. शेंगा वाळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच पाऊस येत आहे. मागील ४८ तासांत या भागात चांगला पाऊस झाला.

आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. त्यामुळे तयार असलेले सोयाबीन सोंगणी, मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच लगबग सुरू होती. त्यातच पावसाने हजेरी दिल्याने हे काम अनेक ठिकाणी थांबले आहे. सोंगणी केलेले सोयाबीन अनेक शेतकऱ्यांना खराब होण्याची भीती वाटत आहे. पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असला, तरी यामुळे सोंगणीचे काम प्रभावित होत आहे. वाळलेल्या शेंगावर सुद्धा बुरशी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सोयाबीनमध्ये ओलावा अधिक, दर कमी 
काढणी केलेले सोयाबीन ओलसर असल्याने या मालाला बाजारात सध्या जेमतेम दर व्यापारी देत आहेत. तयार सोयाबीन सुकवण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाशही सध्या मिळेनासा झालेला आहे. अशा स्थितीत शेतकरी तयार असलेले सोयाबीन मिळेल, त्या दरात व्यापाऱ्यांना विकून मोकळे होत आहेत. ओलसर सोयाबीनचा दर अवघा तीन ते साडेतीन हजारांपासून सुरू होत आहे. तर कमाल दरही ५५००च्या आतच बाजारात मिळत आहे. 

कापूस पट्ट्यातही नुकसान 
पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून कधी पाऊस तर कधी दिवसभर ढगाळ वातावरण तयार झालेले असते. यामुळे वेचणीला आलेला कापूस खराब होत आहे. प्री-मॉन्सून क्षेत्रात यंदा दसऱ्याच्या आधीच काही भागात कापसाची वेचणी सुरू झालेली आहे. हा ओलसर कापूस सुकविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.


इतर बातम्या
कोदामेंढीत विषाणूजन्य रोगामुळे मिरची...कोदामेंढी, नागपूर  : वातावरणातील बदलामुळे...
बीडमध्ये किसान सभेने जाणल्या...बीडमध्ये : किसान सभेच्या ‘शेतकऱ्यांची दिवाळी...
वऱ्हाडात हरभऱ्याच्या लागवडीला आला वेगअकोला ः रब्बी हंगामासाठी पोषक परिस्‍थिती आहे....
शिरूर तालुक्यात वीजजोड तोडल्याने पिके...पुणे : महावितरणने वीजबिल वसुलीसाठी वीजजोड...
परभणी विभागात उन्हाळी हंगामात सोयाबीनचे...परभणी ः  ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी...
रत्नागिरीत अवकाळी पावसाने मोडले कंबरडेसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर...
परभणी जिल्ह्यात शेतीमाल तारणावर १ कोटी...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत...
वीजबिल वसुलीविरोधात अकोटमध्ये आंदोलनअकोला ः थकीत वीजबिल वसुलीसाठी एकीकडे महावितरणकडून...
आजऱ्यात चिखलातच भातकापणी आजरा, जि. कोल्हापूर ः ढगाळ वातावरण तालुक्यात कायम...
पारोळ्यात वृक्ष लागवड योजना पुन्हा सुरू...पारोळा, जि. जळगाव : तालुक्यात मागील काही...
कळसमध्ये वीजबिल वसुलीविरोधात...कळसमध्ये, जि. पुणे ः कृषिपंपांची वीजबिल वसुली...
‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ...सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील स्वच्छतेचे गुणांकन...
शासकीय कृषी तंत्रनिकेतन पदविका प्रवेशास...नाशिक : राज्य शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ...
पीक पाहणीस विमा कंपनीचे प्रतिनिधी...वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी: तालुक्यात अतिवृष्टी व...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
कृषी कायद्यांच्या माघारीवर  कॅबिनेट...नवी दिल्ली : वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनापुढे...
राज्यात गायीच्या दुधाच्या  खरेदीदरात...पुणे ः राज्यातील खासगी डेअरीचालकांना गायीच्या...
खेडा खरेदीमुळे दारव्हा  बाजार समिती...यवतमाळ ः दारव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपल्या...
सोलापूर ः रब्बी हंगामातील प्रमुख...सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार व...