Agriculture News in Marathi Rains threaten soybean, cotton growers | Agrowon

अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस उत्पादकांमध्ये धास्ती 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात बहुतांश तालुक्यात मागील दोन दिवसांत पाऊस झालेला आहे. अद्यापही पावसाचे वातावरण कायम असल्याने सोयाबीन काढणीला आलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात बहुतांश तालुक्यात मागील दोन दिवसांत पाऊस झालेला आहे. अद्यापही पावसाचे वातावरण कायम असल्याने सोयाबीन काढणीला आलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी करून ठेवली असून, पीक ओले होत असल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. गेल्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झालेली आहे. 

सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जूनच्या सुरुवातीला लागवड असलेले सोयाबीन काढणीस आलेले आहे. काही शेतकऱ्यांनी आताचा पाऊस सुरू होण्यापूर्वी सोयाबीन काढणीही केली. परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीसाठी तयार होत आहे. शेंगा वाळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच पाऊस येत आहे. मागील ४८ तासांत या भागात चांगला पाऊस झाला.

आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. त्यामुळे तयार असलेले सोयाबीन सोंगणी, मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच लगबग सुरू होती. त्यातच पावसाने हजेरी दिल्याने हे काम अनेक ठिकाणी थांबले आहे. सोंगणी केलेले सोयाबीन अनेक शेतकऱ्यांना खराब होण्याची भीती वाटत आहे. पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असला, तरी यामुळे सोंगणीचे काम प्रभावित होत आहे. वाळलेल्या शेंगावर सुद्धा बुरशी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सोयाबीनमध्ये ओलावा अधिक, दर कमी 
काढणी केलेले सोयाबीन ओलसर असल्याने या मालाला बाजारात सध्या जेमतेम दर व्यापारी देत आहेत. तयार सोयाबीन सुकवण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाशही सध्या मिळेनासा झालेला आहे. अशा स्थितीत शेतकरी तयार असलेले सोयाबीन मिळेल, त्या दरात व्यापाऱ्यांना विकून मोकळे होत आहेत. ओलसर सोयाबीनचा दर अवघा तीन ते साडेतीन हजारांपासून सुरू होत आहे. तर कमाल दरही ५५००च्या आतच बाजारात मिळत आहे. 

कापूस पट्ट्यातही नुकसान 
पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून कधी पाऊस तर कधी दिवसभर ढगाळ वातावरण तयार झालेले असते. यामुळे वेचणीला आलेला कापूस खराब होत आहे. प्री-मॉन्सून क्षेत्रात यंदा दसऱ्याच्या आधीच काही भागात कापसाची वेचणी सुरू झालेली आहे. हा ओलसर कापूस सुकविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...