Agriculture news in Marathi, The rains threatened the rice growers | Agrowon

पावसामुळे भात उत्पादक धास्तावले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरवात केली आहे. यामुळे भातपट्ट्यातील उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. अशीच स्थिती पुढील दोन-चार दिवस राहिल्यास भाताचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

पश्चिम पट्यातील तालुक्यात जून, जुलै महिन्यांत सुरवातीला कमी पाऊस झाला होता. यामुळे भात लागवडी काही प्रमाणात खोळंबल्या होत्या. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी भाताचे नुकसान झाले होते. कमी कालावधीची आणि वेळेत लागवड झालेली भात पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. या लागवडींना पावसाचा फटका बसत आहे.

पुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरवात केली आहे. यामुळे भातपट्ट्यातील उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. अशीच स्थिती पुढील दोन-चार दिवस राहिल्यास भाताचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

पश्चिम पट्यातील तालुक्यात जून, जुलै महिन्यांत सुरवातीला कमी पाऊस झाला होता. यामुळे भात लागवडी काही प्रमाणात खोळंबल्या होत्या. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी भाताचे नुकसान झाले होते. कमी कालावधीची आणि वेळेत लागवड झालेली भात पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. या लागवडींना पावसाचा फटका बसत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्याऐवजी मावळ व मुळशी भागातील काही शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने थेट भात लागवडी केल्या आहेत. त्यामुळे या भात पिके काढणीच्या अवस्थेत आली आहे. जिल्ह्यात हवेलीत १९४६ हेक्टरवर लागवडी झाली आहे. 

आंबेगामधील पोखरी येथील शेतकरी बाळू भंडारी म्हणाले, ‘‘गेल्या तीन ते चार वर्षांपासून अतिपावसाच्या संकटाशी झुंजत आहे. गेल्या वर्षीही असाचा मोठा पाऊस झाला होता. त्या वेळीही मोठे नुकसान झाले होते. खरिपात चांगला पाऊस होईल म्हणून शेतीचे योग्य नियोजन केले होते. त्यानुसार तीन ते चार एकरांवर भाताची लागवड केली. ऑगस्टमध्ये एकाच दिवशी एवढी अतिवृष्टी झाली, की मोठमोठे शेतातले बांध फुटून वाहत होते. 

यामुळे एक एकरावरील भातपिकाचे संपूर्ण नुकसान झाले. किमान दहा ते बारा क्विंटल भाताचे उत्पादन त्यातून झाले असते. पण पावसाच्या पाण्याने सगळच वाहून नेलं. आता भात पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. दिवाळी झाल्यानंतर भात पिकांची काढणी केली असती; परंतु पुन्हा पावसाने सुरवात केली आहे. असाच पाऊस चार ते पाच दिवस राहिला तर पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील भात लागवड (हेक्टर)
सरासरी क्षेत्र  ७२ हजार ९५४ हे.
यंदा लागवड  ६२ हजार ५०० हे.
पुनर्लागवड ५९ हजार ३९१  (८१ %)
भाताची तालुकानिहाय पुनर्लागवड लागवड (हेक्टर)
मुळशी ८०६०
भोर  ७५१०
मावळ  १२,४६२ 
वेल्हे  ५१८४
जुन्नर  १०३७०
खेड  ७२४२
आंबेगाव  ५२३४
पुरंदर  १३३३

‘चालू वर्षी पाच एकरांवर भात लागवड केली होती. आता भातपिके काढणीला आले होते. पावसामुळे थोडा उशीर केला होता. मात्र, जास्त पाऊस झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.’- संतोश कारके, शेतकरी, डोणे, ता. मावळ


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...