Agriculture News in Marathi Rainy climate in Konkan, Central Maharashtra, Marathwada | Page 3 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला आहे. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला आहे. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

श्रीलंका आणि लगतच्या कोमोरीन समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. ही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आज (ता. २९) अरबी समुद्रात येऊन उत्तरेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. यातच दक्षिण अंदमान समुद्रात मंगळवारपर्यंत (ता. ३०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. कोकण वगळता उर्वरीत राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्याही खाली आले आहे. रविवारी (ता. २८) यवतमाळ येथे नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

पुणे ३०.८ (१३.८), नगर ३१.०(-), जळगाव ३१.६ (१२.६), कोल्हापूर २९.४ (१७.५), महाबळेश्वर २४.९(१४.०), नाशिक २९.९ (१५.५), निफाड २९.२ (१५.०), सांगली २९.६(१६.८), सातारा २९.१(१८.२), सोलापूर ३१.६ (१५.२), सांताक्रूझ ३४.८(२२.५), डहाणू ३२.९ (२०.०), रत्नागिरी ३५.६ (२१.६), औरंगाबाद २९.५ (१२.७), नांदेड ३२.८ (१५.०), उस्मानाबाद ३१.१ (१३.६), परभणी २९.६ (१३.५), अकोला ३२.२ (१५.४), अमरावती ३१.० (१४.०), ब्रह्मपूरी ३४.५ (१४.२), बुलडाणा ३०.२ (१५.२), चंद्रपूर २९.८ (१४.०), गडचिरोली ३०.०(१६.४), गोंदिया ३०.२ (१२.८), नागपूर ३०.८ (१२.४), वर्धा ३०.२(१३.९), वाशीम ३२.५ (१६.०), यवतमाळ ३१.० (१२.०). 
 


इतर बातम्या
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...