पावसाळ्यात ‘पार`चे पाणी चांदवड, येवल्यात : भुजबळ

पावसाळ्यात ‘पार`चे पाणी चांदवड, येवल्यात : भुजबळ
पावसाळ्यात ‘पार`चे पाणी चांदवड, येवल्यात : भुजबळ

देवसाने, जि. नाशिक : येवला व चांदवडचा दुष्काळ हटविण्यासाठी वरदान ठरणारा बहुप्रतीक्षित मांजरपाडा वळण प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. नऊ किलोमीटरच्या बोगद्यापैकी केवळ १२२ मीटर काम बाकी असून, देवसानेतील धरणाचेही ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. बोगद्याचे काम ३१ जानेवारीपर्यंत, तर सांडव्याचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असल्याचे लघुपाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पुढच्या पावसाळ्यात मांजरपाडा वळण योजनेचे पाणी चांदवड, येवल्याला पोचेल, असा विश्‍वास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

भुजबळ यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला हा प्रकल्प ऑक्‍टोबर २०१४ पासून रखडला होता. राज्य सरकारने या प्रकल्पाचा ७० कोटी निधी इतरत्र वळविल्यानंतर भुजबळ यांनी तुरुंगातूनही या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. अखेर त्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार काम सुरू आहे की नाही, हे बघण्यासाठी भुजबळ यांनी शनिवारी लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांसह वळण योजनेच्या कामाची पाहणी केली.

समीर भुजबळ, राजेंद्र जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, जयवंत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, डॉ. भारती पवार, राधाकिसन सोनवणे, प्रकाश वडजे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्रकुमार काले, डॉ. प्रदीप गायकवाड, राजाराम ढगे, दिलीप खैरे आदी उपस्थित होते.

बोगदा पार-कादवासाठी मांजरपाडा वळण योजनेसाठी साडेपाचशे कोटी रुपये खर्च झाला . तरीही या योजनेसाठी तयार करण्यात आलेला बोगदा पार-कादवा नदीजोड प्रकल्पासाठी वापरणे शक्‍य असल्याची माहिती जलतज्ज्ञ राजेंद्र जाधव यांनी या वेळी छगन भुजबळ यांना दिली.

मांजरपाडा प्रकल्प असा

बोगद्याची लांबी ८.९६० किलोमीटर
पार नदीवरील बंधाऱ्याची क्षमता २६७ दशलक्ष घनफूट
मांजरपाडा प्रकल्पाची क्षमता ६१० दशलक्ष घनफूट
बोगद्याची वहनक्षमता २४३ क्‍यूसेक
बोगद्यातून वळणार पाणी पार नदीसह १२ नाले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com