Agriculture news in marathi Raise awareness on soybean pest problem at the right time: Vice Chancellor Dr. Dhavan | Agrowon

सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी जनजागृती करा : कुलगुरु डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

परभणी : ‘‘विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने अत्यंत योग्य वेळी शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन कीड व्यवस्थापनाबाबत जनजागृती करावी,’’ असे आवाहन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या महत्वाचे पिक आहे. सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठीची ही योग्य वेळ आहे. विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने अत्यंत योग्य वेळी शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन कीड व्यवस्थापनाबाबत जनजागृती करावी,’’ असे आवाहन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप), कृषी कीटकशास्त्र विभाग यांच्यातर्फे  ‘सदृढ पर्यावरणासाठी कृषी रसायनांचा संतुलित वापर’ यावरील  राज्यस्तरीय वेबीनार मालिकेअंतर्गत शनिवारी (ता.१) ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सद्यस्थितीत सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे व्यवस्थान हा त्यातील मुख्य विषय होता. मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. अनंत बडगुजर, डॉ. धीरजकुमार कदम आदी सहभागी झाले होते.

डॉ. बडगुजर म्हणाले, ‘‘सोयाबीन हे पिक बदलत्या वातावरणानुसार किडींसाठी जास्त संवेदनशील बनत आहे. सद्यस्थितीत सोयाबिनमध्ये चक्री भुंगा तसेच खोडमाशी या कीडींचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक आढळून येत आहे. सध्याचे वातावरण तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी पुरक आहे. त्यामुळे या किडीच्या सर्वेक्षणावर भर द्या. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे तंत्र प्रभावीपणे राबवा. कामगंध सापळयांचा वापर जास्त करावा, नोमोरिया रिलाई या उपयुक्त बुरशीसाठी सद्याचे वातावरण पोषक आहे. त्यामुळे या बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ’’
‘हुमणी’ वर शनिवारी मार्गदर्शन 

या राज्यस्तरीय वेबिनार मालिकेच्या पुढील भागात शनिवारी (ता.८) संध्याकाळी सात वाजता ‘हुमणी किडीचे व्यवस्थापन’ या विषयावर किटकशास्त्रज्ञ डॉ. धीरजकुमार कदम हे माहिती देतील. या कार्यक्रमाची लिंक शनिवारी सकाळी प्रसारित करण्यात येईल. शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...