सोलापुरात गवार, भेंडी, काकडीला उठाव

Raise guar, okra and cucumber in Solapur
Raise guar, okra and cucumber in Solapur

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार, भेंडी, घेवडा आणि काकडीला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक तुलनेने वाढली. पण मागणी असल्याने दर तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवारीची आवक प्रतिदिन ५ ते १० क्विंटल, भेंडीची १० ते २० क्विंटल, घेवडा आणि काकडीची ८ ते १० क्विंटलपर्यंत राहिली. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या महिना-दीड महिन्यांपासून त्यांच्या आवकेत सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण मागणीमुळे दरातील तेजी ही कायम आहे.

गवारीला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये, भेंडीला किमान ८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, घेवड्याला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर काकडीला किमान ५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, ढोबळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या दरात चढ-उतार राहिला.

पण दर जैसे थे होते. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ९०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक  १७०० रुपये, ढोबळी मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर टोमॅटोला किमान ४०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याच्या दरातील तेजी या सप्ताहातही जैसे थे राहिली. त्यातही मेथी आणि कोथिंबिरीला सर्वाधिक उठाव मिळाला. भाज्यांची आवकही रोज प्रत्येकी ७ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत होती. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १३०० रुपये, कोथिंबिरीला ८०० रुपये ते १२०० रुपये, शेपूला ५०० ते ७०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याच्या दराची उसळी

या सप्ताहात कांद्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली. राज्याच्या अन्य बाजार समितीच्या तुलनेत गुरुवारी (ता. २१) आणि शुक्रवारी (ता. २२) अशा सलग दोन दिवसांत हे दर उच्चांकी पातळीवर पोचले. गुरुवारी बाजारात १२ हजार क्विंटल आवक राहिली आणि प्रतिक्विंटलचा दर किमान दर २०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ८००० रुपये मिळाला. त्याच्या सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा आवक १४ हजार क्विंटलपर्यंत झाली. तरीही दर किमान २०० रुपये, सरासरी ३६०० रुपये आणि सर्वाधिक ९००० रुपयांवर पोचला. राज्यातील लासलगाव, नाशिक या कांद्याच्या आघाडीच्या बाजार समित्यांपेक्षा या दिवशी सर्वाधिक दर सोलापुरात कांद्याला मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com