agriculture news in Marathi raisin of 900 crore without sell Maharashtra | Agrowon

नऊशे कोटींचा बेदाणा पडून

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

 राज्य आणि परराज्यातील बाजारपेठा सुरु झाल्या असल्या तरी अजून बेदाण्याला अपेक्षित मागणी नाही. राज्यात आजअखेर ९५ हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून ८५ हजार ते ९० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

सांगली ः राज्य आणि परराज्यातील बाजारपेठा सुरु झाल्या असल्या तरी अजून बेदाण्याला अपेक्षित मागणी नाही. राज्यात आजअखेर ९५ हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून  ८५ हजार ते ९० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. शीतगृहात ठेवलेल्या बेदाण्याची रक्कम अंदाजे ९०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांना अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे. 

राज्यात दरवर्षी सरासरी बेदाण्याचे १ लाख ९० हजार टन उत्पादन होते. यंदा द्राक्ष हंगामात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्षाची विक्री करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. त्यामुळे यंदा बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले. त्याचवेळी बाजार पेठा बंद असल्याने बेदाण्याची विक्री करता आली नाही. जून महिन्यापासून बेदाण्याचे सौदे सुरु झाले. परंतु अपेक्षित उठाव झाला नाही. मागणी कमी असली तरी दरात चढ-उतार नसल्याचे बेदाणा उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. 

सध्या राज्यात ८५ हजार ते ९० हजार टन बेदाणा शीतगृहात शेतकऱ्यांनी ठेवला आहे. त्याची विक्री अजून बाकी आहे. बेदाणा विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी पुढे येत असले तरी अजून अपेक्षित मागणी नाही. गेल्या महिन्यापासून बेदाण्याला मागणी वाढू लागली आहे. दसरा आणि दिवाळी या सणाला बेदाण्याच्या मागणीत अधिक वाढ होईल, आणि दरही वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तासगावात बाजारात ३५ हजार टन विक्री 
तासगाव बाजार समितीत बेदाण्याचे सौदे सुरु आहेत. सौद्याला ८०० टन बेदाण्याची आवक होत असून ५०० ते ५५० टन विक्री होत आहे. तासगाव बाजार समितीतून सहा महिन्यात ३५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील बेदाणा दृष्टिक्षेप (टनांत)
२ लाख १० हजार

उत्पादन 

९५ हजार ते १ लाख 
बेदाण्याची विक्री 

८५ हजार ते ९० हजार
शिल्लक बेदाणा


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...