agriculture news in Marathi raisin damage by rain Maharashtra | Agrowon

पावसामुळे सात टन मनुका भिजून नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

आम्हाला आदेश नाहीत त्यामुळे आम्ही पंचनामे करू शकत नाही. 
- संतोष पवार, तलाठी
 

झरे, जि. सांगली : विभुतवाडी (ता.आटपाडी) येथील दादा नाना खर्जे यांची सात एकर द्राक्ष बाग आहे. दरवर्षी ते मनुका करतात. यंदा त्यांनी सात टन मनुका तयार केला. मात्र, बुधवारी (ता.१८) रात्री पाऊस आला आणि त्यात शेडवरती मनुका सुकण्यासाठी ठेवलेला मनुका भिजला. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. मात्र, या नुकसानीचा पंचनामा करण्यास तलाठ्याने नकार दिला आहे.

पावसामुळे सात टन मनुका भिजला असून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. भिजलेल्या मनुक्याचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी दादा खर्जे यांनी गावकामगार तलाठी संतोष पवार यांना संपर्क साधला. मात्र, ‘‘आम्हाला पंचनामे करण्याचे आदेश नाहीत त्यामुळे आम्ही पंचनामा करू शकत नाही,’’ असे तलाठी यांनी सांगितले. 

‘‘दहा ते बारा वर्षे दुष्काळाच्या झळा सहन करून टॅंकरने पाणी घालून द्राक्षबागा कशाबशा जगवल्या. मागील काही महिन्यांपूर्वी अवकाळीचा पाऊस पडल्याने तलाव विहिरी तुडुंब झाल्या त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. बऱ्यापैकी द्राक्षे आली. निदान घातलेला खर्च तरी निघेल अशी अपेक्षा होती. परंतु, रात्री अचानक विजेचा गडगडाट, वारा, पाऊस यांमुळे मनुका भिजला आणि वर्षभर केलेलं कष्ट वाया गेले.

तरी त्याची नुकसानभरपाई मिळावी. द्राक्षबागा लावण्यासाठी बँकेचे कर्ज घेतलेला आहे. कसंतरी व्याज भरून फिरवाफिरवी करीत आहे. यावर्षी वाटलं की काही चार पैसे मिळतील परंतु अचानक आलेल्या पावसामुळे मनुका काळसर पडून खराब झाले आहेत तरी शासनाने याचा विचार करावा,’’ अशी मागणी शेतकरी खर्जे यांनी केली.

प्रतिक्रिया
दुष्काळातून कसातरी बाहेर पडलो आणि रात्रीच्या पावसाने मनुका भिजून काळे पडले त्यामुळे त्याला बाजारपेठेत दर मिळणार नाही शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी. गाव कामगार तलाठी यांना फोन वरून मनुका भिजलेली याची माहिती दिली, परंतु तलाठी म्हणाले आम्हाला पंचनामे करण्यासाठी आदेश नाही. तर मग आम्ही दाद कोणाकडे मागायची. 
- दादा खर्जे, मनुका उत्पादक, विभुतवाडी, ता. आटपाडी

 


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...