agriculture news in marathi Raisin gets 305 rupees per kilogram rate in Pandharpur | Agrowon

पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये दर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021

पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्याला नुकताच (ता. २४) उच्चांकी ३०५ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला. तर सरासरी १७५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. 

सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बेदाण्याची आवक आणि दरामध्ये चांगलाच चढ-उतार सुरू आहे. बेदाण्याला नुकताच (ता. २४) उच्चांकी ३०५ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला. तर सरासरी १७५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. 

पंढरपुरात या दिवशी बेदाण्याची सुमारे १५० गाड्यांची आवक होऊन १३१ गाड्या बेदाण्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे व उपसभापती विवेक कचरे यांनी दिली. सभापती श्री. घाडगे म्हणाले, सध्या बेदाणा आवक चांगली असून, खरेदीदार व्यापारी मोठ्या संख्येने येत आहेत. मंगळवारी करकंब येथील उत्पादकाच्या ५० बॉक्स बेदाण्यास ३०५ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला. 

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बेदाण्याचे सौदे दर मंगळवार आणि शनिवारी दुपारी १२ वाजता होत असतात. मालाला उठाव व मागणी चांगली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी न करता फक्त अडते व व्यापारी शारीरिक अंतर पाळून माल विक्री करतात. या वेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, संचालक शैलेंद्र नवाळे, सिकंदर बागवान आदी उपस्थित होते.


इतर अॅग्रोमनी
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...