agriculture news in marathi Raisin price hike of Rs 25 to 30 per kg | Agrowon

बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे सध्या भारताबरोबरची आयात-निर्यात बंद आहे. परिणामी, अफगाणिस्तानातून बेदाणा येत नसल्याने देशांतर्गत उद्योगात ‘फील गुड’ निर्माण झाले आहे.

सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे सध्या भारताबरोबरची आयात-निर्यात बंद आहे. परिणामी, अफगाणिस्तानातून बेदाणा येत नसल्याने देशांतर्गत उद्योगात ‘फील गुड’ निर्माण झाले आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेत राज्यातील बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बेदाण्याच्या दरात २५ ते ३० प्रति किलोस वाढ झाली आहे.

सध्या बेदाण्याला सरासरी १५० ते २४० प्रति किलो असा दर मिळत आहे. येत्या काळात बेदाण्याची आवक वाढून दरातही वाढ होईल, अशी माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली. अफगाणिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे भारतात इतर देशांतून बेदाणा आयात होतो. मात्र तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा करताच अंदाधुंद परिस्थिती निर्माण झाली आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तानमार्गे दळणवळणाची सर्व साधने बंद झाली. अनेक ठिकाणी असणारे चेक पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्याने आयात होणारा माल पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमार्गे भारतात येणाऱ्या बेदाण्याची आयात बंद झाली आहे. त्यामुळे राज्यात तयार होणाऱ्या बेदाण्याला देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढली आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात बेदाणा खाल्याने प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने बेदाण्याच्या विक्रीत वाढ झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सुमारे ६५ ते ७० हजार टन बेदाणा शीतगृहात शेतकऱ्यांनी ठेवला होता. गेल्या पंधरा दिवसांत अंदाजे १७ ते २० हजार टनांची विक्री झाली आहे. सध्या राज्यात ४८ ते ५० हजार टन बेदाणा शीतगृहात शिल्लक आहे. गणेशोत्सव आणि दसरा, दिवाळी सणानिमित्त बाजारात बेदाण्याची विक्री होऊ लागली आहे. 

शेतकऱ्यांत समाधान
सांगली, तासगाव, पंढरपूर बाजार समितीत बेदाण्याच्या सौद्यात आवक एक हजार ते १२५० टन बेदाण्याची आवक होते. त्यापैकी सुमारे ८० टक्के बेदाण्याची विक्री होते. शासनाने देशांतर्गत बाजारपेठांच्या वेळेत वाढ केली आहे. त्याचा फायदा बेदाणा विक्रीस होऊ लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बेदाण्याला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

प्रतिक्रिया...
केंद्र सरकार अफगाणिस्तानला देत असलेल्या सवलतीचा गैरफायदा तिथल्या निर्यातदारांनी घेतला आहे. त्यामुळे भारतातील बेदाण्याच्या दरावर परिणाम होत होता. भारतातील बेदाणा उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नव्हते. सद्यःस्थितीत अफगाणिस्तानातील आयात थांबली असल्याने बेदाणा उत्पादकांना याचा फायदा होत आहे. शासनाने याचे अवलोकन करून भविष्यात अफगाणिस्तानावरुन येणाऱ्या बेदाण्यावर निर्बंध लादावेत.
- सुशील हडदरे, 
बेदाणा व्यापारी, सांगली


इतर अॅग्रो विशेष
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...