agriculture news in Marathi raisin producers in trouble due to lock down Maharashtra | Page 2 ||| Agrowon

लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी 

अभिजित डाके
रविवार, 16 मे 2021

जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार समितीतील बेदाण्याचे सौदे बंद असल्याने बेदाणा विक्री करण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील हंगामासाठी हातात पैसे नसल्याने शेतकरी हातउसने घेऊ लागले आहेत.

सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार समितीतील बेदाण्याचे सौदे बंद असल्याने बेदाणा विक्री करण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील हंगामासाठी हातात पैसे नसल्याने शेतकरी हातउसने घेऊ लागले आहेत. वास्तविक पाहता एप्रिल महिन्यात लग्न समारंभ आणि ईद सणानिमित्त मोठी मागणी असते एका महिन्यात सुमारे १५ हजार टन बेदाण्याची विक्री होते. परंतु सौदे बंद असल्याने बेदाण्याची विक्री झाली नाही. 

जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तासगाव, सांगली बेदाण्याची बाजारपेठ सुरू होती. त्यामुळे तयार बेदाणा उत्पादक विकत होते. मात्र त्यानंतर सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने बाजारपेठा बंद होऊ लागल्या. यामुळे बेदाणा असोसिएशनने सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंढरपूर, विजापूर येथील बाजारपेठादेखील बंद झाल्या. बेदाण्याचे सौदे बंद होऊन एक महिन्याचा कालावधी झाला. तरी देखील सौदे सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उत्पादित झालेला बेदाणा हा थेट शीतगृहात साठवला आहे. वाढत्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. 

राज्य शासनाने पुन्हा पंधरा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा बाजार समित्या बंद राहणार का, अशी चर्चा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. बाजार समित्या सुरू करून सौदे सुरू झाले तर बेदाण्याची विक्री करता येणार आहे. त्यामुळे बाजार समित्या सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. बेदाणा विक्री झाला, तर पुढील पिकासाठी हातात पैसे येतील, अन्यथा पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहील, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

निर्यातीवरही परिणाम 
राज्यातून बेदाण्याची सुमारे २५ ते ३० हजार टन निर्यात होते. प्रामुख्याने बेकरीसाठी बेदाणा निर्यात होतो. सध्या निर्यात सुरू आहे. परंतु निर्यातीस फारशी गती नसल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले आहे. इराणचा बेदाणा देशात विक्रीसाठी येतो. इराणच्या बेदाण्याची आवकही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील बेदाण्याची निर्यात वाढण्यास मदत होईल. 

बाजार समित्यांचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडे 
राज्य शासनाने पुन्हा नव्याने पंधरा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामध्ये बाजार समित्या सुरू ठेवण्याबाबत निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यावा, असे म्हटले आहे. कोरोनाचे नियम पाळून राज्यात सध्या अनेक बाजार समित्या सुरू आहेत. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नियोजन करून बाजार समित्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. बाजार समित्या सुरू झाल्यास बेदाणा सौदेही सुरू होतील. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 

बेदाण्याचे दर (रुपये/किलोस) 
१६५ ते २१० 
हिरवा 
१०० ते १६० 
पिवळा 
४० ते ७० 
काळा 

सौदे बंदचा फटका 

  • यंदा ३० ते ४० रुपयांनी दरात सुधारणा 
  • लग्न, समारंभाच्या हंगामातच लॉकडाउन 
  • एप्रिल महिन्यात उचल तोकडी 
  • लॉकडाउनमुळे निर्यात प्रभावित 
  • आयात घटल्याने दराला आधार 
  • माल शीतगृहात असल्याने आर्थिक चणचण 
  • सौदे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी 

प्रतिक्रिया 
यंदा ४० टन बेदाण्याचे उत्पादन झाले. गतवर्षीपेक्षा बेदाण्याचे दर प्रति किलो ३० ते ४० रुपयांनी वाढले होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजार समितीत बेदाण्याचे सौदे बंद आहे. त्यामुळे बेदाणा विक्री करता आला नाही. सुमारे ८० लाखांचा बेदाणा शिल्लक आहे. हातात पैसे नाहीत. आता पुढच्या हंगामासाठी उसने पैसे घेऊन हंगामाची तयारी करतो आहे. 
- विठ्ठल चव्हाण, बेदाणा उत्पादक, उमदी, ता. जत 

गेल्या वर्षीपासून बेदाण्याचे नुकसान होत आहे. यंदा सौदे बंद असल्याने विक्री करता आली नाही. उचली करून बागा जगवतोय. आम्ही दाद कुणाकडे मागायची. 
- मारुती माळी, बेदाणा उत्पादक, हिंगणवाग, ता. कवठेमहांकाळ 

एप्रिल महिन्यात बेदाण्याला मोठी मागणी असते. सौदे सुरू असते तर एका महिन्यात अंदाजे १५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली असती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने बाजार समिती बंद ठेवल्या आहेत. शासनाने बाजार समिती सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे परिस्थिती पाहून सौदे सुरू केले जातील. 
- मनोज मालू, बेदाणा व्यापारी 


इतर बातम्या
मराठवाड्यातील उपयुक्त पाण्यात किंचित वाढऔरंगाबाद ः मराठवाड्यातील ८७९ मोठ्या, मध्यम व लघू...
मर्जीतल्या शेतकऱ्यांनाच दिला...सिन्नर, जि. नाशिक :  गेल्या वर्षाच्या खरीप...
बोरामणी विमानतळाच्या  भूसंपादनाचा मार्ग...सोलापूर ः सोलापुरातील बहुचर्चित बोरामणी...
कृषी संजीवनी मोहिमेचा बुलडाणा...बुलडाणा ः कृषी विभागाच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञान...
परसबागेतील कुक्कुटपालन ‘एटीएम’सारखेअकोला : ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत...
नांदेड जिल्ह्यात पावसाची ओढ; पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरवातीपासून...
मराठवाडी म्हशींचे संवर्धन, विकासासाठी...परभणी ः मराठवाडा विभागामध्ये मोठ्या संख्येने...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
खामगाव तालुक्यात बंधाऱ्याची निर्मितीबुलडाणा ः ‘सकाळ रिलीफ फंडा’तून खामगाव तालुक्‍...
सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी...अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
कडा येथे कांद्याचे बनावट बियाणे जप्तनगर ः नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कडा (ता....
कुंभोजमध्ये बेकायदा  कीटकनाशकाचा साठा...कोल्हापूर : केंद्र शासनाने सुरक्षिततेच्या...
दुधाला कायद्याने संरक्षण देण्यासाठी ‘...पुणे : शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या...
आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता...नाशिक : ‘‘अठरा पगडजाती, बारा बलुतेदारांना सोबत...
सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस...
सांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ, दर...सांगली ः गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे...