agriculture news in Marathi, raisin production raise in Sangali District, Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ, दर मात्र घसरले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

बेदाण्याचे दर कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु गणपती, दिवाळी दसरा या सणाला दर वाढीला अशी आशा आहे.
- अनिकेत घुळी, शेतकरी, मालगाव, ता. मिरज

सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण आल्याने राज्यात यंदा बेदाण्याचे १ लाख ९० हजार टन उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीपेक्षा ३० हजार टनांनी उत्पादनात वाढ झाली आहे. उत्पादन वाढले, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून बेदाण्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. 

यंदाच्या द्राक्ष हंगामात चांगले वातावरण होते. त्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीसाठी पुढे आहे. राज्यात यंदाच्या बेदाणा हंगामात ३० हजार टनांनी बेदाण्याचे उत्पादन वाढले. वाढलेले उत्पादन दर कमी होण्यास कारणीभूत असल्याची चर्चा शेतकऱ्यांच्यामध्ये आहे. सुरवातीला बेदाण्याचे दर २५० रुपये प्रति किलो असे होते. त्यानंतर हळूहळू बेदाण्याची आवक वाढली. त्याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर झाला. गेल्या महिन्यात बेदाण्याला सरासरी २०५ रुपये असा दर मिळाला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याच्या दरात वाढ होईल, अशी आशा होती. परंतु मागणी नसल्याने बेदाण्याच्या दरात वाढ झाली नाही. तर सातत्याने बेदाणा दर कमी होऊ लागले आहेत. 

बेदाण्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी शीतगृहात ठेवलेला बेदाणा विक्रीस काढण्यास तयार नाहीत. रमजान ईद या सणामध्ये दर वाढले नाहीत. आता येणारा गणपती, दसरा, दिवाळी या सणावर बेदाण्याचे दर अवलंबून आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादकांना दरासाठी या सणापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. 

दोन महिन्यांत ३० रुपयांपर्यंत दर कमी
बेदाण्याचे दर एप्रिल- मेमध्ये सरासरी प्रति किलोस २०० ते २२५ रुपये असा दर होता. परंतु हळूहळू मागणी कमी होईल तशी दर कमी होऊ लागले. बेडण्याच्या दरात प्रत्येक वेळी तीन ते चार रुपये असा दर कमी झाला. वास्तविक पाहता कमी झालेला दर २५ ते ३० रुपये इतका झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे.

बेदणा दृष्टिक्षेपात

  • चांगल्या दर्जेच्या बेदाण्यास १५० ते १९० रुपये प्रति किलो दर 
  • आजपर्यंत ३० ते ३५ टक्के बेदाण्याची विक्री 
  • जिल्ह्यातील शीतगृहात ६५ ते ७० टक्के बेदाणा शिल्लक 

प्रतिक्रिया
बेदाण्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे बेदाण्यास उठाव नाही. त्याचा परिणाम दरावर झाला असून मार्केट थंड आहे. त्यामुळे शेतकरी बेदाणा विक्रीस पुढे येत नाहीत. 
- अरविंद ठक्कर, बेदाणा व्यापारी, सांगली. 

 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...