सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दर

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. १९) झालेल्या बेदाणा सौद्यात चालू हंगामातील २७१ रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला.
Raisins
Raisins

सांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा खरेदीसाठी व्यापारी पुढे येत आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. १९) झालेल्या बेदाणा सौद्यात चालू हंगामातील २७१ रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला. सांगलीतील सौद्यात बेदाण्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सांगलीत बेदाणा सौद्यामध्ये खरेदीसाठी देशातील व्यापारी दाखल झाले आहेत. शुक्रवारच्या सौद्यात २८ दुकानांमध्ये चाळीस गाड्यातून ४०० टन बेदाणा आवक झाली होती. त्यामध्ये नवीन बेदाण्याची ३० टन आवक झाली होती. सौद्यात विनोद कबाडे यांच्या दुकानात सुकुमार सौंदते या शेतकऱ्याचे ४५ बॉक्‍स पवन चौगुले यांनी २७१ रुपये प्रति किलो दराने खरेदी केले. हा दर चालू हंगामातील सर्वात उच्चांकी दर ठरला आहे. सौद्यासाठी विनीत बाफना, मनोज मालू, पप्पू मजलेकर, पवन चौगुले, हिरेन पटेल, शेखर ठक्कर, राजाभाई पटेल, परेश मालू, नितीन मर्दा, सुनील हडदरे, सचिन चौगुले, सोमनाथ मनोळी, अजित पाटील, विनोद कबाडे, ओंकार पिंपळे आदींसह व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यापारी दाखल मार्च अखेरीस होळीचा सण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी देशातील व्यापारी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांनी आपला बेदाणा सांगलीतील सौद्यामध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे. असे मिळाले दर (रुपये/किलो) १५० ते २७१ हिरवा बेदाणा ४० ते ६०  काळा बेदाणा  १२० ते १७० पिवळा बेदाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com