agriculture news in Marathi raisin rate at 271 rupees Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दर

टीम अॅग्रोवन
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. १९) झालेल्या बेदाणा सौद्यात चालू हंगामातील २७१ रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला.

सांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा खरेदीसाठी व्यापारी पुढे येत आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. १९) झालेल्या बेदाणा सौद्यात चालू हंगामातील २७१ रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला.

सांगलीतील सौद्यात बेदाण्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सांगलीत बेदाणा सौद्यामध्ये खरेदीसाठी देशातील व्यापारी दाखल झाले आहेत. शुक्रवारच्या सौद्यात २८ दुकानांमध्ये चाळीस गाड्यातून ४०० टन बेदाणा आवक झाली होती. त्यामध्ये नवीन बेदाण्याची ३० टन आवक झाली होती.

सौद्यात विनोद कबाडे यांच्या दुकानात सुकुमार सौंदते या शेतकऱ्याचे ४५ बॉक्‍स पवन चौगुले यांनी २७१ रुपये प्रति किलो दराने खरेदी केले. हा दर चालू हंगामातील सर्वात उच्चांकी दर ठरला आहे.

सौद्यासाठी विनीत बाफना, मनोज मालू, पप्पू मजलेकर, पवन चौगुले, हिरेन पटेल, शेखर ठक्कर, राजाभाई पटेल, परेश मालू, नितीन मर्दा, सुनील हडदरे, सचिन चौगुले, सोमनाथ मनोळी, अजित पाटील, विनोद कबाडे, ओंकार पिंपळे आदींसह व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यापारी दाखल
मार्च अखेरीस होळीचा सण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी देशातील व्यापारी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांनी आपला बेदाणा सांगलीतील सौद्यामध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे.

असे मिळाले दर (रुपये/किलो)
१५० ते २७१
हिरवा बेदाणा
४० ते ६० 
काळा बेदाणा 
१२० ते १७०
पिवळा बेदाणा 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...