नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बातम्या
बेदाणा दरात वाढीचे संकेत
सांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आहेत. सध्या ३० ते ३५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. पुढील काही दिवसात बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती तासगाव बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी बेदाणा उत्पादनासाठी पोषण वातावरण होते. त्यामुळे राज्यात यंदा बेदाण्याचे १ लाख ८० हजार टन उत्पादन झाले होते. गतवर्षीपेक्षा २५ हजार टनाने उत्पादन वाढले होते. त्यामुळे बेदाण्याचे दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु सन २०१७-१८ मधील बेदाणा शिल्लक नसल्याने दरात फारसा फरक पडला नाही.

दरम्यान, बेदाणा हंगामाच्या सुरवातीला बेदाण्याला ११० ते १६० रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. त्यानंतर हळूहळू मागणीत वाढ होत गेल्याने बेदाण्याच्या दर कधी चढे राहिले तर कधी कमी राहिले.
गेल्या वर्षी दिवाळी नंतर बेदाण्याचे सौदे झाले, त्या सौद्यामध्ये बेदाण्याला प्रतिकिलोस १३० ते १८५ रुपये असा दर मिळाला होता. त्यानंतर दरात वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात १४० ते २२० रुपये असा दर होता. यंदाच्या दिवाळीनंतर झालेल्या सौद्यात २१५ रुपये असा दर मिळाला होता. तसे पाहिले यंदा ५ रुपयांनी दर कमी मिळाला. परंतु येत्या काही दिवसांत बेदाण्याची मागणी वाढेल, त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात बेदाण्याचे १ लाख ८० हजार टन उत्पादन झाले होते. आजअखेर १ लाख ५० हजार टन बेदाण्याची विक्री झाली असून ३० ते ३५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. बेदाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने यंदाचाही बेदाणा शिल्लक राहणार नाही.
- 1 of 1502
- ››