बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात

गेल्यावर्षी ऑक्टोबर अखेर पाऊस झाल्याने तब्बल एक महिना उशिराने बेदाणा निर्मितीस प्रारंभ झाला. यंदा बेदाणा निर्मिती वेळेवर सुरु झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
Raisins
Raisins

सांगली ः गेल्यावर्षी ऑक्टोबर अखेर पाऊस झाल्याने तब्बल एक महिना उशिराने बेदाणा निर्मितीस प्रारंभ झाला. यंदा बेदाणा निर्मिती वेळेवर सुरु झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पुढील दहा ते पंधरा दिवसांत बेदाणा निर्मितीचा हंगाम संपेल, अशी माहिती बेदाणा उत्पादक शेतकरी आणि बेदाणा निर्मिती शेड मालकांनी दिली.

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍यात प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. सुमारे दोन ते तीन हजार बेदाणा शेडवर बेदाण्याची निर्मिती होते. या भागात कोरडे वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होतो. गेल्यावर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेदाणा निर्मिती सुरु झाली होती. मार्च महिन्यात कोरोना विषाणूमुळे बेदाणा निर्मितीवर संकट आले होते. तसेच द्राक्ष विक्री थांबली. परिणामी टेबलग्रेप्स थेट बेदाणा शेडवर येऊ लागली. त्यामुळे कवठेमहांकाळ परिसरात गतवर्षीपेक्षा चालूवर्षी एक ते दीड हजार शेडची संख्या वाढली होती. राज्यात सुमारे २ लाख १० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते.

दरवर्षी या भागात बेदाणा शेडची दुरुस्ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होते. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षे बेदाणा तयार करण्यासाठी येतात. गेल्यावर्षी अतिवृष्टी, त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षाची फळ छाटणी रखडली होती. एकाच वेळी छाटणी झाली. त्यामुळे एकाचवेळी द्राक्षे तयार झाली. त्यामुळे बेदाणा निर्मितीचा हंगाम एका महिन्यांनी उशिरा सुरु झाला. हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांची बेदाणा निर्मितीची धांदल फारच कमी होती. त्यानंतर बेदाणा निर्मितीस गती आली. मार्च महिन्यात बेदाणा शेडवर बेदाणा निर्मितीसाठी लगबग सुरु होती. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाणा निर्मितीची गती काही प्रमाणात कमी झाली असल्याचे चित्र आहे. दरवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम तीन ते चार महिने चालतो. यंदा मात्र दोन महिनेच हंगाम चालला आहे. यंदा बेदाण्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे. प्रतिक्रिया यंदा बेदाणा निर्मितीचा हंगाम उशिरा सुरु झाला. दोन वर्षापेक्षा चालुवर्षी हंगाम दोन महिनेच सुरु राहिला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसात बेदाणा निर्मिती थांबेल. गेल्यावर्षीपेक्षा यंदा बेदाण्याच्या उत्पादन घट होईल, अशी स्थिती सध्यातरी दिसते आहे. - सुनील माळी, बेदाणा उत्पादक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com