बेदाणानिर्मिती हंगाम लांबणीवर पडणार

यंदा अतिवृष्टीचा फटका द्राक्ष बागांना आहे. त्यामुळे फळ छाटणी उशिरा सुरू झाली. याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होणार आहे.
बेदाणानिर्मिती हंगाम लांबणीवर पडणार
बेदाणानिर्मिती हंगाम लांबणीवर पडणार

सांगली : यंदा अतिवृष्टीचा फटका द्राक्ष बागांना आहे. त्यामुळे फळ छाटणी उशिरा सुरू झाली. याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होणार आहे. दरवर्षी जानेवारीच्या मध्यावर सुरू होणारा बेदाणानिर्मितीचा हंगाम तब्बल एक महिन्याने पुढे जाणार असल्याचे बेदाणानिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील कवेठमहांकाळ तालुक्यातील नागज येथे प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. या भागातील कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, कच्च्या मालाची उपलब्धता आणि जवळपासची बाजारपेठ या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने तालुक्यात बेदाण्याचे सुमारे सहा हजार शेड आहेत. गतवर्षी महापूर आणि अतिवृष्टीचा ऐन हंगामामध्ये बसला होता. त्यामुळे बेदाणा हंगाम दरवर्षीपेक्षा पंधरा ते वीस दिवस अगोदर सुरू झाला होता. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने विक्रीच्या द्राक्षाचे बेदाणा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला होता. त्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली होती. यंदा देखील द्राक्ष हंगामावरील संकटाची मालिका सुरूच होती. सुरुवातीपासूनच पडणारा पाऊस यामुळे बागेत पाणी साचून राहिली. त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत सातत्याने पाऊस सुरू होता. त्यामुळे फळ छाटणी लांबणीवर पडली. त्यामुळे फळदेखील उशीराच येणार आहे. दरम्यान, हंगाम सुरू होण्याअगोदर त्याची स्वच्छता केली जाते. त्या शेडची डागडुगी केली जाते. दरवर्षी ही कामे डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरू होतात. परंतु यंदा डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा आला तरी बेदाणा शेडची दुरुस्ती, स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले नसल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यात बेदाणा शेडची दुरुस्ती, आणि स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार असल्याचे बेदाणा तयार करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे यंदाचा बेदाणा हंगाम लांबणीवर पडणार आहे. प्रतिक्रिया.. यंदा पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यातच फळ छाटणीच्या वेळी पडलेल्या पावसाने फळ छाटणी विलंबाने सुरू झाली. त्यामुळे बेदाण्याच्या हंगामाला एक महिना उशिरा सुरू होईल. सध्या शेडच्या दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यात सुरू करणार आहे. - सुनील माळी, बेदाणा उत्पादक व शेडमालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com