agriculture news in Marathi raisin of two thousand crore in cold storage Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दोन हजार कोटींचा बेदाणा शीतगृहात पडून 

अभिजित डाके
मंगळवार, 4 मे 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सांगली-तासगावमधील बेदाणा सौदे बंद होऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला. गेल्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अंदाजे ३० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे.

सांगली ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सांगली-तासगावमधील बेदाणा सौदे बंद होऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला. गेल्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अंदाजे ३० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सध्या शीतगृहात १ लाख २० हजार टन बेदाणा आहे. सौदे सुरु होते त्यावेळी बेदाण्याला सरासरी प्रति किलोस १६० रुपये असा दर होता. त्या दरानुसार अंदाजे १९२० कोटींचा बेदाणा शीतगृहात आहे. सौदे बंद असल्याने आगामी द्राक्ष पिकासाठी पैशांची जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. 

राज्यात गेल्यावर्षी २ लाख १० हजार टन बेदाणा तयार झाला होता. यंदाच्या हंगामात १ लाख ५० हजार टन बेदाणा निर्मिती झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६० हजार टनाने बेदाण्याचे उत्पादन घटले. त्याचे कारण म्हणजे गेल्यावर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरवातीस नैसर्गिक आपत्तींचा फटका बसल्याने एकाच वेळी द्राक्ष छाटणी झाली. त्यामुळे हंगाम उशिरा सुरु झाला. यंदा बेदाण्याचा हंगाम उशिरा सुरु झाला. त्यामुळे नवीन बेदाणा उशिरा बाजारपेठेत दाखल झाला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बेदाण्यास १५० ते २४० असा दर होता.

गतवर्षीच्या तुलनेत बेदाण्याला चांगले दर मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीस पुढे आले. त्या दरम्यान, सुमारे ३० हजार टन बेदाण्याची विक्री झाली. एप्रिल महिन्याच्या १४ तारखेपासून सांगली आणि तासगाव बेदाणा असोशिएशनने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंधरा दिवस सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला. सौदे बंद असल्याने शेतकऱ्यांनी बेदाणा शीतगृहात ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. 

राज्यात यंदा १ लाख ५० टन बेदाणा तयार असून त्यापैकी ३० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. अर्थात १ लाख २० टन बेदाणा शेतकऱ्यांनी शीतगृहात ठेवला आहे. एप्रिलच्या सरासरी १६० रुपये प्रति किलो दरानुसार १ लाख २० हजार टनाची किंमत १९२० कोटीच्या घरात आहे. पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर बेदाण्याचे सौदे पूर्ववत होतील, अशी आशा होती. परंतु बेदाण्याचे सौदे सुरु झाले नाही. बेदाणा सौदे सुरु करण्याबाबत बेदाणा असोसिएशन बैठक घेणार आहे. त्यामध्ये पुन्हा काय निर्णय होणार आहे याकडे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, ही बैठक कधी होणार आहे, याबाबत शाशंकता आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांसाठी पुन्हा लॉक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सौदे बंद असल्याने आगामी द्राक्ष पिकासाठी पैशांची जुळव करण्याचा प्रश्‍न उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. 

इतर ठिकाणीही सौदे बंद 
पंढरपूर येथे दर मंगळवारी बेदाण्याचे सौदे होतात. मात्र, विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बाजार समितीत बेदाण्याचे सौदे बंद होते. मंगळवारी (ता. ४) बेदाण्याचे सौदे होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर विजापूर येथे सुद्धा बेदाण्याचे सौदे बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेदाणा सौदे सुरु करण्याबाबत शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

बेदाणा उत्पादन व विक्री (टनांत) 
१.५० लाख 
उत्पादन 
३० हजार 
विक्री 
१.२० 
शिल्लक 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...