Agriculture news in Marathi, Raising of chemical-based vegetable production, export cluster: Adhalrao Patil | Agrowon

रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन, निर्यात क्लस्टर उभारा ः आढळराव पाटील
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

पुणे ः राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

पुणे ः राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

देशाच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी निती आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये ६ विविध राज्यांच्‍या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची नियुक्ती केली आहे. ही समिती देशातील कृषी, पणन, पशुसंवर्धन आणि निर्यात क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवणार आहे.  यामुळे या समितीने उत्तर पुणे जिल्ह्यात रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी विशेष क्लस्टर उभारण्याची मागणी आढळराव पाटील यांनी केली आहे. या मागणीबाबत लिहिलेल्या पत्रामध्ये आढळराव यांनी म्हटले आहे की, ‘‘महाराष्ट्रातील शेतीप्रधान असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्याचे मी प्रतिनिधित्व करत आहे. यामध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या शेतीप्रधान तालुक्यांचा समावेश आहे. हा प्रदेश निसर्ग आणि शेतीसमृद्ध असून, शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्यातक्षम फळे भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. या प्रदेशातील बहुतांश भाजीपाला हा मुंबईसह देशाच्या विविध भागांत पाठविला जात आहे. यामुळे या परिसरातील शेतीमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी क्लस्टर उभारणे आवश्‍यक आहे.

‘‘हे क्लस्टर तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील फ्लोरिकल्चर पार्कच्या धर्तीवर ‘रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन देणारे असावे. शेतीतील वाढत्या रसायनांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे देशांर्गत आणि परदेशांतून रसायनमुक्त भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. बाजारपेठेची ही गरज आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठी क्लस्टरची नितांत गरज आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून तशी शिफारस आपण आपल्या समिती अहवालात करावी,’’ अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे.

आध्यात्मिक व आरोग्य पर्यटनासाठी निसर्गोपचार केंद्र उभारा 
ग्रामीण भागातील पर्यटन संधीदेखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायद्याचे आहे. यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा दिलेला आहे. शेती बरोबरच निसर्ग, आध्यात्मिक आणि आरोग्य पर्यटनासाठीदेखील चालना देणे गरजेचे आहे. आंबेगाव तालुका हा आदिवासीबहुल क्षेत्र असून, या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे एक देवस्थान असून, हा परिसर संरक्षित अभयारण्यात आहे. यामुळे या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक, शिवभक्त येत असतात. पर्यटकांची संख्या लक्षात घेता, या परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारणे उचित ठरेल. तरी भीमाशंकर परिसरात आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून निसर्गोपचार केंद्र उभारण्याची शिफारस आपण करावी, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...