agriculture news in marathi Raisins reaches 251 rupees per kilogram in Solapur | Agrowon

सोलापुरात बेदाण्याला कमाल २५१ रुपये दर

ॲग्रोवन वृत्तसेवा
रविवार, 4 एप्रिल 2021

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यातील बेदाणा लिलावात बेदाण्याला प्रतिकिलोला सर्वाधिक २५१ रुपयांचा प्रतिकिलो दर मिळाला आहे. एकूण ३६ टन बेदाणा आवक झाली होती. त्यापैकी २० टन बेदाण्याची विक्री झाली.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यातील बेदाणा लिलावात बेदाण्याला प्रतिकिलोला सर्वाधिक २५१ रुपयांचा प्रतिकिलो दर मिळाला आहे. एकूण ३६ टन बेदाणा आवक झाली होती. त्यापैकी २० टन बेदाण्याची विक्री झाली. त्यातून ३ कोटी ३८ लाख रुपयांची उलाढाल झाली. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपनहळ्ळी येथील गंगाधर बिराजदार यांच्या बेदाण्यास सर्वाधिक २५१ रुपयांचा दर मिळाला. खरेदीसाठी तासगाव, सांगली, विजापूर येथील व्यापारी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बेदाण्याच्या दरात तेजी आहे. आठवड्यातून एकदा दर गुरुवारी बाजार समितीमध्ये बेदाण्याचे लिलाव होतात. सध्या बेदाण्याची सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच आहे.

दरम्यान, बेदाण्याचा हंगामही आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्याने एक महिना उशिराने हंगाम सुरू झाला. त्यामुळे उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यताही बेदाणा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २५ हजाराहून अधिक एकरवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रावरील द्राक्षांचा बेदाणा तयार होतो. पंढरपूर, सांगोला, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागांत प्रामुख्याने बेदाणा शेड आहेत.

  अशी आवक, अशी विक्री
गुरुवारी झालेल्या लिलावावेळी बसवेश्‍वर ट्रेडर्सकडे ४१४४ किलो आवक होती, त्यापैकी २ हजार ७२ किलो विक्री झाली. ४० ते २१७ रुपयांचा दर मिळाला. विश्‍वजित हेले यांच्याकडे १६४७ किलो आवक झाली होती, त्यापैकी ८२४ किलोची विक्री झाली. ४० ते १८७ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. व्ही. आर. बिराजदार यांच्याकडे ९ हजार ६०५ किलोची आवक झाली होती, त्यापैकी ४८०३ किलो विक्री झाली. ४० ते २२१ रुपयांचा दर मिळाला. रक्षा ट्रेडिंग कंपनीकडे ५४६३ किलो आवक असून, २७३२ किलो विक्री झाली. ४० ते २११ रुपयांचा दर मिळाला आहे. पंडित अंबारे यांच्याकडे ३२४४ किलोची आवक झाली असून, ३२४४ किलोची विक्री झाली आहे. ४० ते २५१ रुपयांचा दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...