बेदाण्याला दराची गोडी

गतवर्षीच्या तुलनेत बेदाण्याच्या दरात २५ ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा बेदाण्याला दराची गोडी राहील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
बेदाण्याला दराची गोडी
बेदाण्याला दराची गोडी

सांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, राज्यात बेदाण्याचे उत्पादन १.७० लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागील एका महिन्यात अंदाजे ३० हजार टनांहून अधिक बेदाण्याची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत बेदाण्याच्या दरात २५ ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा बेदाण्याला दराची गोडी राहील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.  राज्यातील सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांसह कर्नाटकातील विजापूर येथे मोठ्या प्रमाणात बेदाणा तयार केला जातो. गेल्या चार ते पाच वर्षांत राज्यात बेदाणा उत्पादनात वाढ होताना दिसते आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे बेदाण्याला मिळणारा दर. राज्यात गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला अन् द्राक्ष हंगामावर संकट आले. वाहतूक थांबली, त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीला पसंती दिली. त्यामुळे २ लाख १० हजार टन बेदाणा उत्पादन झाले होते. वास्तविक पाहता हे बंपर उत्पादन म्हणावे लागेल. उत्पादन जरी जास्त झाले असले तरी, बेदाण्याची विक्रीही झाली.   दरवर्षी बेदाण्याचा हंगाम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर पाऊस होता. त्यामुळे द्राक्षाच्या फळ छाटणीस विलंब झाला. परिणामी, बेदाण्याचा हंगाम लांबणीवर पडला. फेब्रुवारीमध्ये हंगामाला सुरुवात झाली. त्यामुळे नवीन बेदाणा बाजारपेठेत येण्यास मार्च महिना उजाडला. ळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाण्याला मागणी वाढली. त्यातच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या आहारात बेदाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे दरात वाढ झाली. मागील एकाच महिन्यात सुमारे ३० हजार टनांहून अधिक बेदाण्याची विक्री देखील झाली. सध्या बेदाण्यास प्रति किलोस १५० ते २४० असा दर मिळतोय. यंदा बेदाण्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.   यंदा पोषक वातावरण बेदाणानिर्मितीच्या काळात अवकाळी पावसाचा फटका बेदाणानिर्मितीला बसतो. तसेच वातावरणात बदल झाला तरीही दर्जेदार बेदाणा तयार होत नाही. परिणामी, बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. गेल्या वर्षी आणि यंदा बेदाणानिर्मितीस पोषक वातावरण होते. कसल्याही प्रकारचे संकट आले नाही. अवकाळी पाऊस झाला नाही. त्यामुळे पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे. राज्यातील बेदाण्याचे उत्पादन वर्ष    बेदाणा उत्पादन (लाख टन) २०१३-१४    १.३०  २०१४-१५    १.८०  २०१५-१६    १.७०  २०१६-१७    १.८०  २०१७-१८    १.६०  २०१८-१९     १.९०  २०१९-२०    २.१०  २०२०-२१     १.७० (अंदाजे)

(माहिती स्रोत ः तासगाव बाजार समिती, तासगाव)

बेदाणा बाजाराची स्थिती

  •     यंदा ३० ते ३५ हजार टनांनी उत्पादन घटीची शक्यता
  •     गेल्या तीन वर्षांत प्रति किलोस सरासरी ९० ते १८० रुपये दर राहिले
  •     यंदाच्या हंगामात नवीन बेदाणा मार्चमध्ये दाखल
  •     बेदाण्याची एका महिन्यात ३० हजार टनांहून अधिक विक्री 
  •     भविष्यात दरात वाढ होण्याची शक्यता
  •     ६० टक्के बेदाण्याची शीतगृहात साठवणूक 
  •     बाजारपेठेतील मागणीनुसार शेतकऱ्यांकडून बेदाणा विक्री होणार
  • दराची स्थिती
  •     सध्याचे दर (प्रति किलो) ः १५० ते २४०
  •     गेल्या वर्षी तुलनेत प्रति किलोस २५ ते ३५ रुपयांनी वाढ
  •     यंदा नवीन बेदाणा उशिरा आला
  • प्रतिक्रिया... यंदा बेदाण्याचा हंगाम उशिरा सुरू झाला असला, तरी दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे. दिवाळीनंतर बेदाण्याचे दर टिकून आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर चांगले मिळत असून याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.  - सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

    बेदाणानिर्मितीच्या खर्चात वाढ होत असून, दरात वाढ होणे आवश्यक आहे. दरवर्षी गणपती आणि दिवाळी सणाला बेदाण्याची मागणी वाढते. त्यामुळे या काळात बेदाण्याची विक्री करतो. अपेक्षित दर मिळतात. - नकुल कोरे, बेदाणा उत्पादक, कागवाड, ता. कागवाड

    गेल्या वर्षी अतिवष्टीमुळे बागांचे मोठे नुकसान झाल्याने त्यातूनही बागा जगविल्या. बेदाण्याचे उत्पादन चांगले मिळत असून वातावरण पोषक असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चांगले दर आहेत.  - सुरेश कोडग, बेदाणा उत्पादक, आगळगाव, ता. कवठेमहांकाळ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com