agriculture news in marathi Raisins sweetens as rates increases | Agrowon

बेदाण्याला दराची गोडी

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

गतवर्षीच्या तुलनेत बेदाण्याच्या दरात २५ ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा बेदाण्याला दराची गोडी राहील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

सांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, राज्यात बेदाण्याचे उत्पादन १.७० लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागील एका महिन्यात अंदाजे ३० हजार टनांहून अधिक बेदाण्याची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत बेदाण्याच्या दरात २५ ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा बेदाण्याला दराची गोडी राहील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

राज्यातील सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांसह कर्नाटकातील विजापूर येथे मोठ्या प्रमाणात बेदाणा तयार केला जातो. गेल्या चार ते पाच वर्षांत राज्यात बेदाणा उत्पादनात वाढ होताना दिसते आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे बेदाण्याला मिळणारा दर. राज्यात गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला अन् द्राक्ष हंगामावर संकट आले. वाहतूक थांबली, त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीला पसंती दिली. त्यामुळे २ लाख १० हजार टन बेदाणा उत्पादन झाले होते. वास्तविक पाहता हे बंपर उत्पादन म्हणावे लागेल. उत्पादन जरी जास्त झाले असले तरी, बेदाण्याची विक्रीही झाली.
 
दरवर्षी बेदाण्याचा हंगाम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर पाऊस होता. त्यामुळे द्राक्षाच्या फळ छाटणीस विलंब झाला. परिणामी, बेदाण्याचा हंगाम लांबणीवर पडला. फेब्रुवारीमध्ये हंगामाला सुरुवात झाली. त्यामुळे नवीन बेदाणा बाजारपेठेत येण्यास मार्च महिना उजाडला.

ळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाण्याला मागणी वाढली. त्यातच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या आहारात बेदाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे दरात वाढ झाली. मागील एकाच महिन्यात सुमारे ३० हजार टनांहून अधिक बेदाण्याची विक्री देखील झाली. सध्या बेदाण्यास प्रति किलोस १५० ते २४० असा दर मिळतोय. यंदा बेदाण्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.  

यंदा पोषक वातावरण
बेदाणानिर्मितीच्या काळात अवकाळी पावसाचा फटका बेदाणानिर्मितीला बसतो. तसेच वातावरणात बदल झाला तरीही दर्जेदार बेदाणा तयार होत नाही. परिणामी, बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. गेल्या वर्षी आणि यंदा बेदाणानिर्मितीस पोषक वातावरण होते. कसल्याही प्रकारचे संकट आले नाही. अवकाळी पाऊस झाला नाही. त्यामुळे पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे.

राज्यातील बेदाण्याचे उत्पादन
वर्ष    बेदाणा उत्पादन (लाख टन)
२०१३-१४    १.३० 
२०१४-१५    १.८० 
२०१५-१६    १.७० 
२०१६-१७    १.८० 
२०१७-१८    १.६० 
२०१८-१९     १.९० 
२०१९-२०    २.१० 
२०२०-२१     १.७० (अंदाजे)

(माहिती स्रोत ः तासगाव बाजार समिती, तासगाव)

बेदाणा बाजाराची स्थिती

 •     यंदा ३० ते ३५ हजार टनांनी उत्पादन घटीची शक्यता
 •     गेल्या तीन वर्षांत प्रति किलोस सरासरी ९० ते १८० रुपये दर राहिले
 •     यंदाच्या हंगामात नवीन बेदाणा मार्चमध्ये दाखल
 •     बेदाण्याची एका महिन्यात ३० हजार टनांहून अधिक विक्री 
 •     भविष्यात दरात वाढ होण्याची शक्यता
 •     ६० टक्के बेदाण्याची शीतगृहात साठवणूक 
 •     बाजारपेठेतील मागणीनुसार शेतकऱ्यांकडून बेदाणा विक्री होणार
 • दराची स्थिती
 •     सध्याचे दर (प्रति किलो) ः १५० ते २४०
 •     गेल्या वर्षी तुलनेत प्रति किलोस २५ ते ३५ रुपयांनी वाढ
 •     यंदा नवीन बेदाणा उशिरा आला

प्रतिक्रिया...
यंदा बेदाण्याचा हंगाम उशिरा सुरू झाला असला, तरी दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे. दिवाळीनंतर बेदाण्याचे दर टिकून आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर चांगले मिळत असून याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

बेदाणानिर्मितीच्या खर्चात वाढ होत असून, दरात वाढ होणे आवश्यक आहे. दरवर्षी गणपती आणि दिवाळी सणाला बेदाण्याची मागणी वाढते. त्यामुळे या काळात बेदाण्याची विक्री करतो. अपेक्षित दर मिळतात.
- नकुल कोरे, बेदाणा उत्पादक, कागवाड, ता. कागवाड

गेल्या वर्षी अतिवष्टीमुळे बागांचे मोठे नुकसान झाल्याने त्यातूनही बागा जगविल्या. बेदाण्याचे उत्पादन चांगले मिळत असून वातावरण पोषक असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चांगले दर आहेत. 
- सुरेश कोडग, बेदाणा उत्पादक, आगळगाव, ता. कवठेमहांकाळ


इतर अॅग्रोमनी
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...