agriculture news in Marathi, Raj Thakarey says, Dont trust on party with power, Maharashtra | Agrowon

सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका ः राज ठाकरे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

मुंबई: लोकांच्या मनातला सरकारविरोधी राग व्यक्त करण्यासाठी ही निवडणूक मी लढवतो आहे. आम्हाला निवडून यायचे आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष जनतेला हवं तसं चिरडून टाकेल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना तुम्ही आता बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १०) केले. गोरेगाव येथे निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

मुंबई: लोकांच्या मनातला सरकारविरोधी राग व्यक्त करण्यासाठी ही निवडणूक मी लढवतो आहे. आम्हाला निवडून यायचे आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष जनतेला हवं तसं चिरडून टाकेल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना तुम्ही आता बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १०) केले. गोरेगाव येथे निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्व शिवसेना भाजपमधून निवडणूक लढवतात, कुठे आहे पार्टी विथ डिफरन्स? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुखांनी आरोळी ठोकली होती की, आम्ही राजीनामा देऊ, आता कोणाही पुढे जाणार नाही. आमची एवढी वर्षे सत्तेत सडली आणि आता यांची १२४ जागांवर अडली, अशी मार्मिक टीकाही त्यांनी केली. या असल्या लोकांच्या भूलथापांना तुम्ही आता बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे.

मला ईडीची नोटीस आली, त्या वेळेस चौकशी झाल्यावर मी बोललो होतो, की ईडीची चौकशी लावा, काही करा माझे थोबाड बंद होणार नाही,” असेही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. सध्या उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत, बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकार थंड आहे कारण कोणी काही बोलत नाही. शिवस्मारकाचे काय झाले, आपल्या गडकिल्ल्यांना सरकार लग्नाला द्यायला निघाले आहे, तरीही माध्यमे, आणि लोके थंड बसलेत. सरकार म्हणते की, आम्ही १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या. मुंबईत रस्त्यांवर जे खड्डे पडलेत त्या खड्डयांना मुख्यमंत्री ‘विहिरी’ म्हणत आहेत का? काय बोलतेय सरकार? आणि आता पुन्हा नवीन गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहेत. 

महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या ३७० कलमबद्दल बोलत आहेत. ३७० कलम काढले याबद्दल अभिनंदन. पण या आमच्या महाराष्ट्राच्या निवडणुकांशी त्याचा काय संबंध? आमच्या प्रश्नांविषयी कधी बोलणार? आमच्या बेरोजगार तरुणांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी कधी बोलणार? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...