agriculture news in marathi, raj thakary demand to postpone assembly election due to flood situation, mumbai, maharashtra | Agrowon

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकला ः राज ठाकरे

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मुंबई : राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज्यातील सद्यःस्थिती पाहता निवडणूक आयोगाने हा निर्णय घ्यावा. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून लोकांना आधार देणे, त्यांची घरे उभारणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी श्री. ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबई : राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज्यातील सद्यःस्थिती पाहता निवडणूक आयोगाने हा निर्णय घ्यावा. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून लोकांना आधार देणे, त्यांची घरे उभारणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी श्री. ठाकरे यांनी केली आहे. 

श्री. ठाकरे म्हणाले, की भाजप सरकारला आणि मंत्र्यांना जनतेशी काहीही देणे घेणे नाही. त्यांचे २३०, २५० जागा येणार असे आकडेही ठरले आहेत. तुम्ही पुरात अडका किंवा दुष्काळात लटका आम्हाला काय करायचेय, अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. सध्याची पूरस्थिती पाहता तेथील नागरिकांचा प्रश्न गंभीर आहे. पावसाचे पाणी ओसरल्यानंतरही तेथील जनजीवन सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात. त्यासाठी मी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.


इतर ताज्या घडामोडी
कथित अफवेचा टोमॅटो रोपांच्या मागणीवर...कोल्हापूर: कोरोनापेक्षा घातक व्हायरस टोमॅटोवर...
अकोला जिल्ह्यात आता दिवसाला हजार...अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया...
जळगावात एक क्विंटल कापसामागे चार किलोची...जळगाव : एक क्विंटल कापसामागे चार किलो कापसाची...
‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी माजी...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
अकोला झेडपी शेतकऱ्यांना अनुदानावर देणार...अकोला  ः यंदा विविध संकटांमुळे हवालदिल...
नगर जिल्ह्यात ७१ हजार ६६५ क्विंटल तूर...नगर  ः नगर जिल्ह्यात नाफेडने सुरु केलेल्या...
खानदेशात गोदामांअभावी मका खरेदीला विलंब...जळगाव  ः खानदेशात मक्‍याच्या शासकीय...
औरंगाबादमध्ये १६७५ टन खते, ६० क्विंटल...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...
शासन करणार ५० हजार टन युरियाचा बफर... नगर  : राज्यात खरीप हंगामाची तयारी...
वाघूर नदीकाठी पाटचारीत आवर्तन सोडा,...जळगाव  ः वाघूर नदीकाठी व शिवारातील टंचाई...
औरंगाबाद जिल्हयात मागणीनुसार ८ हजारावर...औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन... बुलडाणा   ः जिल्ह्यातील...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लातूरमधील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास...परभणी : लातूर येथील विलासराव देशमुख कृषी...
‘केव्हिकें’नी मधमाशीपालनातील उद्योजक...परभणी : ‘‘मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान...
नगर जिल्ह्यात गतवर्षीच्या शिल्लक...नगर  ः नगर जिल्ह्याला खरिपासाठी २ लाख ९१...
शिधापत्रिका नसणाऱ्यांना दोन महिन्यांचे...पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्‍या...
नाशिक जिल्ह्यात 'मूठभर कापूस जाळा'...नाशिक : खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर येऊनही...
बुलडाण्यात २६ हजार ७४८ शेतकऱ्यांकडे...बुलडाणा  ः यंदा असंख्य अडचणींना सामोरा जात...
पुणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांत...पुणे  : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ८२ गावांत...