agriculture news in marathi, Rajaram Bapu takes hard work for public welfare: Sharad Pawar | Agrowon

राजारामबापूंनी लोककल्याणासाठी घेतले टोकाचे कष्ट : शरद पवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

इस्लामपूर, जि. सांगली : ‘‘लोकनेते राजारामबापू पाटील यांनी लोकांच्या भल्यासाठी टोकाचे कष्ट घेतले. खूजगाव धरणावरून बापू-दादांचा टोकाचा संघर्ष झाला. मात्र यातून जिल्ह्याचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी एकत्र बसून हा वाद मिटविला. खूजगाव येथे धरण झाले असते, तर जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा संपला असता,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजारामनगर येथील सभेत व्यक्त केले. 

इस्लामपूर, जि. सांगली : ‘‘लोकनेते राजारामबापू पाटील यांनी लोकांच्या भल्यासाठी टोकाचे कष्ट घेतले. खूजगाव धरणावरून बापू-दादांचा टोकाचा संघर्ष झाला. मात्र यातून जिल्ह्याचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी एकत्र बसून हा वाद मिटविला. खूजगाव येथे धरण झाले असते, तर जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा संपला असता,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजारामनगर येथील सभेत व्यक्त केले. 

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित समारंभात पवार बोलत होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रीय युवा नेता कन्हैयाकुमार, माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते. याप्रसंगी सरोजिनी चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘राजयोगी’, व ‘विधी मंडळातील बापू’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 

पवार म्हणाले,‘‘ बापू उद्योगमंत्री होते. त्यांनी राज्यात औद्योगिक वसाहत उभी करून स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्याकडे विधायक दृष्टी होती.`` 

शिंदे म्हणाले, ‘‘बापूंनी इंदिरा गांधींचा २० कलमी कार्यक्रम गोर-गरिबांच्या घरापर्यंत नेला. त्यांनी गोर-गरिबांची सेवा करण्याची नाळ कधी तुटू दिली नाही.’’

कन्हैयाकुमार म्हणाले, ‘‘भाजपला हरविण्यासाठी बापूंचा आदर्श घेऊन जनसंघर्ष उभा करायला हवा. भाजपला घालवायला इंग्रजांपेक्षा जादा कष्ट घ्यायला हवेत.’’

पाटील म्हणाले,‘‘तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या मुळाशी बापूंचा विचार आहे. भविष्यात नव्या पिढीस प्राधान्य देऊ.’’ शाहीर आझाद नायकवडी यांनी बापू, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला. 

जयंतराव हे उद्याचे महाराष्ट्र चालविणारे नेतृत्व

‘‘उद्याचा महाराष्ट्र चालविणारे नेतृत्व म्हणून आम्ही जयंतरावांकडे पाहतो. आमचे काही लोक पक्ष सोडून चालले आहेत. ते म्हणतात कामे होत नाहीत. मात्र कामे कशी करून घ्यायची हे त्यांनी जयंतरावांकडून शिकावे,’’ असा टोला शरद पवार यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांना मारला.
 

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...