राजारामबापू कारखाना उसाचे २५ लाख टन गाळप करणार

राज्याचे जलसंपदामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने राज्याच्या सहकारक्षेत्रात एक मापदंड निर्माण केला आहे.
Rajarambapu factory will grind 25 lakh tonnes of sugarcane
Rajarambapu factory will grind 25 lakh tonnes of sugarcane

इस्लामपूर, जि. सांगली : राज्याचे जलसंपदामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने राज्याच्या सहकारक्षेत्रात एक मापदंड निर्माण केला आहे. राजारामबापूच्या चार युनिटमध्ये २५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी साखराळे येथे व्यक्त केली.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटचा सन २०२०- २१ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन अॅड. डांगे, त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली डांगे यांच्याहस्ते करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, भगवान पाटील, विठ्ठल पाटील, सुवर्णा पाटील, जालिंदर कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. बॉयलर विभागाचे सचिन सन्मुख यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

अॅड. डांगे म्हणाले की, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी साखराळेच्या माळावर साखर कारखाना उभा करून वाळवा तालुक्‍याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. आज हा कारखाना जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात यशस्वी वाटचाल करीत आहे. शेतकऱ्यांच्या विश्वास पात्र ठरलेला साखर कारखाना म्हणून आपल्या कारखान्याची राज्यात ओळख निर्माण झाली आहे.

पी. आर. पाटील म्हणाले की, साखराळे युनिटमध्ये ११ लाख, वाटेगाव-सुरुल शाखेत ६ लाख, कारंदवाडी युनिटमध्ये ५ लाख, तर जत तिप्पेहळळी युनिटमध्ये ३ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचा समावेश आहे. प्रताप पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कामगार नेते शंकरराव भोसले, कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष एम. जे. पाटील, माजी पंंचायत समिती सदस्य सुभाष आडके, एस. डी. कोरडे, सुनील सावंत, तानाजी खराडे, राजेंद्र चव्हाण, जयंत निबंधे, प्रेमनाथ कमलाकर, व्ही. बी. पाटील उपस्थित होते. विजय मोरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com