राजर्षी शाहू शेतकरी आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी (गोकुळ) सत्ताधाऱ्यांविरोधात राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची सोमवारी (ता. २२) घोषणा करण्यात आली.
राजर्षी शाहू शेतकरी आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात Rajarshi Shahu Farmers Front On the ground against the authorities
राजर्षी शाहू शेतकरी आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात Rajarshi Shahu Farmers Front On the ground against the authorities

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी (गोकुळ) सत्ताधाऱ्यांविरोधात राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची सोमवारी (ता. २२) घोषणा करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आघाडीची घोषणा करण्यात आली.  

या वेळी विद्यमान संचालक अरुणकुमार डोंगळे, जयश्री पाटील, विश्वास नारायण पाटील उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करण्यात आली. या वेळी माजी आमदार सत्यजित पाटील, जनसुराज्य प्रवक्ते विजयसिंह जाधव, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘गोकुळची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढविणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वजण एकत्र येऊन ही निवडणूक लढविणार आहोत. राजेश पाटील, प्रकाश आबीटकर आमच्या सोबत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये जादा दर कसा येईल, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com