agriculture news in Marathi Rajasthan govt cut the mundi tax Maharashtra | Agrowon

राजस्थान सरकारकडून मंडी शुल्कात कपात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

राजस्थान सरकारने मंडींमध्ये शेतमालाची खरेदी आणि विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या मंडी शुल्कात कपात केली आहे.

जयपूर: राजस्थान सरकारने मंडींमध्ये शेतमालाची खरेदी आणि विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या मंडी शुल्कात कपात केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कपात करत असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आहे. 

राज्यातील धान्य व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी सायंकाळी शुल्क कपातीसंदर्भात निर्णय घेतला. ज्वारी, बाजरी, मका, जिरे आणि इसबगोल यासरख्या शेतमालावर आता केवळ ०.५ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. मे महिन्याच्या सुरवातीलाच राजस्थान सरकारने मंडी शुल्क २ दोन टक्के केले होते. त्यात कपात करून आता ०.५ टक्के करण्यात आले आहे. तसेच तेलबिया, कडधान्य आणि गहू यासारख्या शेतमालावरील शुल्क १.६० टक्के करण्यात आले आहे. 

राजस्थान सरकारने शेतमालाच्या खरेदी-विक्रीवरील मंडी शुल्कात वाढ करून दोन टक्के केल्यानंतर राज्यातील व्यापारी ६ मेपासून संपावर गेले होते. व्यापाऱ्यांनी राज्यातील २४७ मंडींमधील शेतमालाचे व्यवहार थांबविले होते. कोरोनाच्या संकटाच्या काळात धान्यावर शुल्क लावण्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर सरकारने व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा मंडी शुल्कात कपात केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
‘अटल भूजल’मध्ये जळगावातील चार तालुके जळगाव : तेरा जिल्ह्यांत एक हजार ३३९...
खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या...नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने...
करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य...करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा)...
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन...
चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन...गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून...
नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि...
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली...हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा...
पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा...नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने...
बटाटा लागवड ठरली फायदेशीरमहाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी,...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलनसातारा  : कृषी कायद्याविरोधात पंजाब व...
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटपअकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५...
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसररिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण...
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - ...यवतमाळ :  जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१...
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून...संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका...
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास केंद्र...कोल्हापूर : दोन दिवसांत दिल्लीतील...
गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदीगोंदिया : जिल्ह्यात हमीभावाने खरेदीसाठी सुरू...
अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘...पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे...
‘ग्रामविकास’कडून वर्षभरात लोकाभिमुख...कोल्हापूर : गेल्या एक वर्षांच्या कालावधीत...
शेतकऱ्यांना अडविणारे राजकारणातून संपणारवर्धा : देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी...