agriculture news in Marathi Rajasthan govt cut the mundi tax Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राजस्थान सरकारकडून मंडी शुल्कात कपात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

राजस्थान सरकारने मंडींमध्ये शेतमालाची खरेदी आणि विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या मंडी शुल्कात कपात केली आहे.

जयपूर: राजस्थान सरकारने मंडींमध्ये शेतमालाची खरेदी आणि विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या मंडी शुल्कात कपात केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कपात करत असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आहे. 

राज्यातील धान्य व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी सायंकाळी शुल्क कपातीसंदर्भात निर्णय घेतला. ज्वारी, बाजरी, मका, जिरे आणि इसबगोल यासरख्या शेतमालावर आता केवळ ०.५ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. मे महिन्याच्या सुरवातीलाच राजस्थान सरकारने मंडी शुल्क २ दोन टक्के केले होते. त्यात कपात करून आता ०.५ टक्के करण्यात आले आहे. तसेच तेलबिया, कडधान्य आणि गहू यासारख्या शेतमालावरील शुल्क १.६० टक्के करण्यात आले आहे. 

राजस्थान सरकारने शेतमालाच्या खरेदी-विक्रीवरील मंडी शुल्कात वाढ करून दोन टक्के केल्यानंतर राज्यातील व्यापारी ६ मेपासून संपावर गेले होते. व्यापाऱ्यांनी राज्यातील २४७ मंडींमधील शेतमालाचे व्यवहार थांबविले होते. कोरोनाच्या संकटाच्या काळात धान्यावर शुल्क लावण्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर सरकारने व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा मंडी शुल्कात कपात केली आहे. 


इतर बातम्या
शेतीविषय तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रसार...नगर  ः बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढील...
बाहेरून आलेल्यांचे विलगीकरणाची जबाबदारी...पुणे  : `कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
एचटीबीटी कपाशी बियाणे खरेदी करु नका,...हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाची मान्यता...
कोल्हापूर जिल्ह्यात धूळवाफ पेरणीस...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धूळ वाफ पेरण्यास...
उसाची एफआरपी तीन हजार रुपये करण्याची...कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा किमान दर...
यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका...यवतमाळ ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन जाहीर...
चाकण येथील जनावरांचा बाजार शनिवारपासून...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
कळंब बाजार समिती पावसाळ्यापूर्वी करणार...यवतमाळ ः पावसाळ्यापूर्वी कापूस विकला जाईल किंवा...
चंद्रपुरात खरिपासाठी २९ हजार टन खते...चंद्रपूर ः गेल्या हंगामात खत टंचाईचा सामना...
उन्हाळ्यात वन्यजिवांसाठी पाण्याची सोय...अमरावती ः उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी...
कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक...पुणे  ः राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांना...
विदर्भात मागणी पुरवठ्यातील तफावतीमुळे...नागपूर ः संचारबंदीत मिळालेल्या शिथिलतेमुळे...
बांबूपासून अगरबत्ती उद्योगातून महिलांना...यवतमाळ ः अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या...
नाशिक बाजार समिती आजपासून तीन दिवस बंद नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवटी मुख्य...
पुणे बाजार समितीतील भुसार बाजार सुरुपुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील...
सोलापुरात १३ हजारांवर शेतीपंपांच्या...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना...
सोलापुरात कारहुणवीनिमित्त निघणारी...सोलापूर  ः सोलापूर परिसर, दक्षिण सोलापूर आणि...
सोलापुरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत...सोलापूर  ः पंढरपूर, सांगोला, मोहोळ आणि आता...