agriculture news in Marathi, rajendra nikam says, integrated pesticide management need in boll worm, Maharashtra | Agrowon

गुलाबी बोंड अळीचे सामूहिकरीत्या एकीकृत कीड व्यवस्थापन करा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 जुलै 2018

अकोला : जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील दहीगाव, थार, कोठा येथे प्री-मॉन्सून लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर फुलोरावस्थेतच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून अाला असून, या कीडीचा प्रादुर्भाव इतर भागांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे सामूहीकरीत्या एकीकृत कीडव्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले अाहे.

अकोला : जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील दहीगाव, थार, कोठा येथे प्री-मॉन्सून लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर फुलोरावस्थेतच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून अाला असून, या कीडीचा प्रादुर्भाव इतर भागांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे सामूहीकरीत्या एकीकृत कीडव्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले अाहे.

तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंड अळी अाढळून अाल्यानंतर कृषी अधिकारी व विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी पाहणी केली.   यामध्ये दहिगाव, थार व कोटा या तीन गावांमध्ये एकत्रित ३.२० हेक्टर क्षेत्रावर फुले व पाते अवस्थेत असलेल्या पूर्व हंगामी कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा दोन ते तीन टक्के प्रादुर्भाव दिसून आला. प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सभा घेऊन कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांमार्फत उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. 

प्रादुर्भाव आढळलेल्या तीनही शेतकऱ्यांच्या शेतावर कामगंध सापळे बसवण्यात आले आहेत. त्याच्या कार्यपद्धतीविषयी, तसेच प्रादुर्भाव वाढल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. वरील तीन गावांतील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील वगळता जिल्ह्यात अन्यत्र सध्या प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. 

शेतकऱ्यांनी कापूस पिकाची नियमित निरीक्षण करीत सामूहीकरीत्या उपाययोजना केल्यास प्रादुर्भाव रोखता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे नियमित निरीक्षण ठेवावे, पिकामध्ये एकरी किमान दोन कामगंध सापळे व व्यवस्थापनासाठी एकरी आठ कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांमध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून कीटकनाशक मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. कापूस पिकात अाढळलेल्या डोमकळ्यात प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे हाताने ताेडून त्यातील अळी नष्ट करावी.

पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून फवारावी,  बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा हेक्टरी एक ते दीड लाख अंडी शेतामध्ये लावावीत. कीडीने नुकसानीची पातळी अोलांडल्यास  क्विनॉलफॉस २०  मिली, किंवा थायोडीकार्ब (७५ टक्के डब्ल्यूपी) २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळून नॅपसॅक पंपानेे फवारणी करावी, असेही श्री. निकम यांनी सांगितले       अाहे.  
 


इतर अॅग्रो विशेष
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...