agriculture news in marathi, Rajendra Pawar elected as state grapes association Head, pune, maharashtra | Agrowon

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पवार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

द्राक्ष शेतीसमोरील प्रश्‍न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडविण्याची भूमिका राज्य द्राक्ष बागायतदार संघाने नेहमीच घेतली आहे. बदलत्या काळात शेतीसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाशी जोडून अधिकाधिक काम करावे लागणार आहे. येत्या काळात संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एकत्रित ताकद वाढविण्याबरोबरच प्रगत राष्ट्रातील आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे आणण्यावर आमचा भर राहणार आहे.
-राजेंद्र पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

पुणे  : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पवार, उपाध्यक्षपदी शिवाजी पवार व खजिनदारपदी कैलास भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघाच्या पुणे येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची निवड झाली. मागील कार्यकारिणीचा कालावधी संपल्यानंतर ही निवड करण्यात आली.

द्राक्ष शेती व बागायतदार संघात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले राजेंद्र पवार यांची राज्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवड झाली. कार्यकारिणीचे संचालक म्हणून अरविंद कांचन, प्रताप काटे, विनायक दंडवते, दत्तात्रय ठिकेकर, विनायक पाटील, चंद्रशेखर पाटील, शिवलिंग संख, किशोर बाबर, हणमंत चव्हाण, दीपक पाटील, राजगोंडा पाटील, सुरेश एकुंडे, दत्तकुमार साखरे, चनगोंडा हविनाळे, शिवानंद माळी, राजेंद्र देशमुख, राजकुमार शेळके, प्रशांत देशमुख, शंकर येणगुरे, माणिकराव पाटील, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब भालेराव, श्‍याम शिरसाठ, रवींद्र निमसे, यतीन कदम, बाळासाहेब गडाख, मधुकर क्षीरसागर यांची निवड झाली.

याशिवाय पुणे विभागाच्या अध्यक्षपदी रामभाऊ धावणे, नाशिक विभागाच्या अध्यक्षपदी रवींद्र बोराडे, सांगली विभागाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लांडगे, सोलापूर विभागाच्या अध्यक्षपदी आशिष काळे यांची निवड झाली. या वेळी संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे, अशोक गायकवाड, ऑल इंडिया ग्रेप फार्मर्स फेडरेशनचे अध्यक्ष सोपान कांचन, ऑल इंडिया ग्रेप एक्‍स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे आदी उपस्थित होते.
 

इतर अॅग्रो विशेष
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...