नवनिर्वाचित आमदार राजेश एकडे पोचले बांधावर; केली पीकनुकसानीची पाहणी

पीक नुकसानीची पाहणी करताना आमदार राजेश एकडे
पीक नुकसानीची पाहणी करताना आमदार राजेश एकडे

बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. जिल्ह्यात सर्वात धक्कादायक निकाल ठरलेल्या मलकापूर मतदारसंघात काँग्रेसच्या राजेश एकडे यांनी बाजी मारली. मतदारसंघात एकीकडे विजयाचा जल्लोष सुरू असतानाच आमदारांनी मात्र स्वागत सत्कार बाजूला ठेवत शनिवारी (ता.२६) सकाळीच मतदारसंघातील शेतांना भेटी देत पीक परिस्थितीची पाहणी केली. पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मलकापूर मतदारसंघात या वर्षी पावसाने प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटले असून कापूस पिकाचे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. ही परिस्थिती पाहता आमदार एकडे यांनी नांदुरा तालुक्यातील दहीवडी, शेलगाव, नायगाव कोलासर, पिंप्री अढाव, डवळा बाजार, तरवाडी या परिसरातील गावांना भेट दिली. या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान धांडे, नायब तहसीलदार मार्कंड, मंडळ अधिकारी जी. टी. ठाकरे, पानझाडे, तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम अंगाईत आदींसह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com