‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड

देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ॲग्रो इन्पुट्‌स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एम’च्या अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड

पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ॲग्रो इन्पुट्‌स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एम’च्या अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. “कायद्यातील जाचक अटींच्या विरोधात विविध स्तरांवर संघटना लढा देईल”, असा निर्धार धुरगुडे पाटील यांनी पदाची सूत्रे हाती घेताना व्यक्त केला.

कायद्याच्या कक्षेत चालणार व्यवसाय“शेतकऱ्यांसाठी निविष्ठा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही खते, पीक संरक्षण साधने ही शेतकऱ्यांना सतत हवी असतात. मात्र असे असूनही संशोधित खते, संजीवके व उत्तेजके श्रेणीतील उत्पादनांना शासकीय मान्यता आणि कायद्याचे संरक्षण देण्यत आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू होती व प्रामाणिक उद्योजकांचे, विक्रेत्यांचेही आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळेच दहा वर्षांपूर्वी आम्ही ‘एम’ची यशस्वी पायाभरणी केली,” अशी माहिती धुरगुडे यांनी दिली.   “निविष्ठांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी ‘एम’ने लढा दिला. त्यामुळे केंद्र सरकारने कायदा मंजूर केला. संघटनेच्या पाठपुराव्याला आलेले हे मोठे यश आहे. मात्र आता कायद्यातील जाचक अटी रद्द होण्यासाठी लढा दिला जाईल. कृषी निविष्ठा उद्योगाचे परवाने जास्तीत जास्त सभासदांना परवाने मिळवून देण्यासाठीदेखील संघटना प्रयत्न करेल. हा व्यवसाय आता कायदेशीर झाल्याने शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळणार असल्याने  शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे. त्यामुळे शेवटी प्रामाणिक उद्योजकांनाही विकासाची संधी उपलब्ध होईल”, असेही धुरगुडे यांनी स्पष्ट केले.  पुण्यात झालेल्या या सभेला दीडशे उद्योजक प्रत्यक्ष; तर २०० पेक्षा जास्त उद्योजक दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रास्ताविक कोठावदे यांनी, तर जमाखर्च कोशाध्यक्ष सिसोदे यांनी सादर केला. सचिव पाथरे यांनी नवीन कायद्याची महत्त्वपूर्ण माहिती सादर केली, तर आभारप्रदर्शन शिंदे यांनी केले.

नवी कार्यकारिणी एकमताने जाहीर  ‘एम’च्या अकराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठरलेल्या नव्या कार्यकारिणीत समीर पाथरे, प्रदीप कोठावदे, रवींद्र अग्रवाल, चंदन शहा, सर्जेराव शिसोदे, वैभव काशीकर, प्रकाश औताडे, राजीव चौधरी, अनिल हवल आणि प्रशांत शिंदे या कृषी उद्योजकांची फेरनिवड करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com