agriculture news in marathi Rajkumar Dhurgude reelected for Agro Input Manufacture Association of India as Chairman | Page 2 ||| Agrowon

‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ॲग्रो इन्पुट्‌स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एम’च्या अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.

पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ॲग्रो इन्पुट्‌स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एम’च्या अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. “कायद्यातील जाचक अटींच्या विरोधात विविध स्तरांवर संघटना लढा देईल”, असा निर्धार धुरगुडे पाटील यांनी पदाची सूत्रे हाती घेताना व्यक्त केला.

कायद्याच्या कक्षेत चालणार व्यवसाय“शेतकऱ्यांसाठी निविष्ठा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही खते, पीक संरक्षण साधने ही शेतकऱ्यांना सतत हवी असतात. मात्र असे असूनही संशोधित खते, संजीवके व उत्तेजके श्रेणीतील उत्पादनांना शासकीय मान्यता आणि कायद्याचे संरक्षण देण्यत आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू होती व प्रामाणिक उद्योजकांचे, विक्रेत्यांचेही आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळेच दहा वर्षांपूर्वी आम्ही ‘एम’ची यशस्वी पायाभरणी केली,” अशी माहिती धुरगुडे यांनी दिली.  

“निविष्ठांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी ‘एम’ने लढा दिला. त्यामुळे केंद्र सरकारने कायदा मंजूर केला. संघटनेच्या पाठपुराव्याला आलेले हे मोठे यश आहे. मात्र आता कायद्यातील जाचक अटी रद्द होण्यासाठी लढा दिला जाईल. कृषी निविष्ठा उद्योगाचे परवाने जास्तीत जास्त सभासदांना परवाने मिळवून देण्यासाठीदेखील संघटना प्रयत्न करेल. हा व्यवसाय आता कायदेशीर झाल्याने शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळणार असल्याने  शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे. त्यामुळे शेवटी प्रामाणिक उद्योजकांनाही विकासाची संधी उपलब्ध होईल”, असेही धुरगुडे यांनी स्पष्ट केले. 

पुण्यात झालेल्या या सभेला दीडशे उद्योजक प्रत्यक्ष; तर २०० पेक्षा जास्त उद्योजक दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रास्ताविक कोठावदे यांनी, तर जमाखर्च कोशाध्यक्ष सिसोदे यांनी सादर केला. सचिव पाथरे यांनी नवीन कायद्याची महत्त्वपूर्ण माहिती सादर केली, तर आभारप्रदर्शन शिंदे यांनी केले.

नवी कार्यकारिणी एकमताने जाहीर 
‘एम’च्या अकराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठरलेल्या नव्या कार्यकारिणीत समीर पाथरे, प्रदीप कोठावदे, रवींद्र अग्रवाल, चंदन शहा, सर्जेराव शिसोदे, वैभव काशीकर, प्रकाश औताडे, राजीव चौधरी, अनिल हवल आणि प्रशांत शिंदे या कृषी उद्योजकांची फेरनिवड करण्यात आली.


इतर अॅग्रोमनी
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....