जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सर्वस्तरातून अभिवादन
राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४२२ व्या जन्मोत्सवदिनी मंगळवारी (ता. १२) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजवाड्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शिवभक्त, नागरिकांनी राजमाता जिजाऊसाहेब यांना अभिवादन केले.
सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४२२ व्या जन्मोत्सवदिनी मंगळवारी (ता. १२) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजवाड्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शिवभक्त, नागरिकांनी राजमाता जिजाऊसाहेब यांना अभिवादन केले.
सूर्योदयी प्रथम महापूजा राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते सपत्नीक झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही सपत्नीक राजमाता जिजाऊसाहेब महापूजन केले. देऊळगावराजा येथील श्री बालाजी महाराज संस्थानचे वंश पारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी जिजाऊंचे दर्शन घेऊन वंदन केले.
खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी राजमाता जिजाऊसाहेब यांना अभिवादन केले. जिल्हा परिषदेच्या वतीने अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल बुधवत, पंचायत समिती सभापती नंदिनी देशमुख, उपसभापती लता खरात, जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री शेळके, सुनील शेळके, नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सतीश तायडेजिल्हा पोलिस अधीक्षक चावरिया व ठाणेदार जयवंत सातव त्यांचे यांनी पोलिस प्रशासनाच्या वतीने अभिवादन केले. जिजामाता राजवाडा परिसरात सजावट करण्यात आली होती.
मराठा सेवा संघाचा सोहळा
जिजाऊ जन्मोत्सवी मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी सहा वाजता महापूजन केले. सकाळी नऊ वाजता जिजाऊ सृष्टीवर ध्वजवंदन झाले. सकाळी ९ ते ११ या वेळेत शाहिरांनी पोवाडे सादर केले. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होती.
- 1 of 653
- ››