agriculture news in marathi, Raju Shetti criticizes state government on farmers issue | Agrowon

...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

सध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न आ वासून उभे आहे आणि भाजप-शिवसेनेचे सरकार ३७० कलमांची भाषा करून शेतकऱ्यांना भुलविण्याचे काम करीत आहे. सध्या सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडाला असला, तरी सत्ताधारी पक्षांकडून कुठेच शेतकऱ्याच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही हे दुर्दैवी आहे. गेल्या दोन-तीन महिन्याचा विचार केला, तर राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय वाईट गेले आहेत.

सध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न आ वासून उभे आहे आणि भाजप-शिवसेनेचे सरकार ३७० कलमांची भाषा करून शेतकऱ्यांना भुलविण्याचे काम करीत आहे. सध्या सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडाला असला, तरी सत्ताधारी पक्षांकडून कुठेच शेतकऱ्याच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही हे दुर्दैवी आहे. गेल्या दोन-तीन महिन्याचा विचार केला, तर राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय वाईट गेले आहेत.

राज्यात सगळीकडे दुष्काळाने शेतकऱ्यांचे जगणे अवघड केले आहे. वेळेत पाऊस सुरू न झाल्याने अनेक भागात हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील पिके जळून गेली. त्यांना तातडीने पीक विम्याची गरज होती. परंतु शासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. राज्यातील शेतकरी जगण्यासाठी झुंजत आहे. हे कमी की काय म्हणून पश्‍चिम महाराष्ट्रात महापुराने बागायतदार शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले. कोट्यवधी रुपयांची पिके पाण्याखाली गेली. घरांची दुरवस्था झाली. पण याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही.

पुराच्या वेळी अनेक घोषणा केल्या पण त्या किती प्रत्यक्षात आल्या. कुणी कुणाला विचारायला तयार नाही. ज्या नागरिकांची घरे पडलेली आहेत. त्यांचे भाडे शासनाने देण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण यातील किती रक्कम शेतकऱ्यांना मिळाली याचे उत्तर शासनानेच द्यावे. सध्या महापुरात खचलेल्या शेतकऱ्याला विविध प्रकारे मदत करून त्याला उभारी देण्याची गरज आहे. पण सध्या सगळेच जण निवडणुकीत व्यस्त आहेत.

सरकारने कोणतेही प्रश्‍न सोडविले नाहीत. महापुराने उसाचे मोठे नुकसान झाले. यातच सरकारने एफआरपीची रक्कम वाढविली नाही. खताचे दर वाढलेले आहे. मशागतीचे खर्च वाढले. एफआरपीची रक्कमही कारखान्यांनी दिली नाही. पुरामुळे बुडालेल्या उसाचे काय करायचे हा प्रश्‍न आहे. शेतातला कचरा काढण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यापुढे आहे. पण हातात पैसे नसल्याने शेतकरी सरकारकडे आशाळभूत नजरेने पहात आहे. बाधित ऊस गाळला तर त्याची रिकव्हरी कमी येणार आहे. याचा परिणाम ऊस दरावर होणार आहे. ऊस उत्पादकाला दर देताना सरासरी रिकव्हरी धरावी.

सध्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बोलायचे झाले तर विरोधी पक्ष सातत्याने शेती प्रश्‍नाबाबत आवाज उठवायचा प्रयत्न करीत आहेत. पण सत्ताधारी पक्षाकडून या प्रश्‍नाला बगल देऊन अनावश्‍यक प्रश्‍नांचीच जाहिरातबाजी होत आहे. खरे तर ही विधानसभेची निवडणूक आहे. केंद्रीय स्तरावरील प्रश्‍न सोडवणुकीची माहिती या निवडणुकीत उपयोगाची नाही. स्थानिक पीक पद्धती, स्थानिक अडचणी, त्याची सोडवणूक यावर चर्चा व्हायला हव्यात. पण हे सगळे सोडून शेतकरी विरहीत चर्चाच झडत आहेत. या चर्चांचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर ग्रामीण भागातील जनजीवनावर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही.

आज पीकविमा, संपूर्ण कर्जमाफी यांसारखे शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासारखे प्रश्‍न सोडविण्यासारखे आहेत. कर्जमाफीचा मोघमात निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्याला अडचणीत टाकले आहे. सर्वप्रथम ही सरसकट कर्जमाफी व्हायला हवी अशी माझी मागणी आहे. आवश्‍यक असणाऱ्या शेतीप्रश्‍नांना बगल देऊन इतर गोष्टीवरच राजकारणाची पोळी भाजून घेतली आहे. हे खूपच संतापजनक आहे. 

- राजू शेट्टी, 
स्वाभिमानी शेतकरी संघटना

(शब्दांकन ः राजकुमार चौगुले)

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद : केंद्रीय पथकाने अनुभवली पीक...औरंगाबाद  : मराठवाड्यात केंद्राच्या...
‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचनकोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे...
पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय...अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी शेतकरी...मुंबई  : लवकरच राज्यात सत्तेवर येणाऱ्या...
बोगस खतांची तक्रार केली होती : मिश्रखत...पुणे: राज्यात काही भागांमध्ये मिश्रखताचे बोगस...
संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी'...सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर,...
कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही...
केंद्र शासनाचे आदेश धाब्यावरपुणे : मिश्रखतांमधील बोगस उत्पादनाला पायबंद...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीपुणे: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन...
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...