agriculture news in marathi Raju Shetti Demands probe in Agri Equipment Fraud | Agrowon

अवजार घोटाळ्याची चौकशी करा : राजू शेट्टी

ॲग्रोवन वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

राज्यात कृषी अवजारवाटपात मोठा घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. 
 

पुणे : राज्यात कृषी अवजारवाटपात मोठा घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. 

‘अॅग्रोवन’ने एका विशेष वृत्तमालिकेतून अवजार वाटपाताली सावळागोंधळ चव्हाट्यावर आणला होता. याबाबत ‘स्वाभिमानी’ राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. “राज्यातील कृषी विभागात सर्वत्र सावळा गोंधळ सुरू आहे. शासनाने विकत घेतलेली सुमारे ८५ हजार अवजारे राज्यातील कृषी अधीक्षकांनी संबंधित शेतकऱ्यांना वाटलेली नाहीत. 

या अवजारांमध्ये एचडीपीई पाइप, सिंचन पंप, मळणी यंत्र, स्वयंचलित यंत्र, पॉवर ट्रिलर, ट्रॅक्टरचलित अवजारे आदी अवजारांचा समावेश आहे. मुळात अत्यल्प भूधारक, आदिवासी तसेच मागासवर्गीय व साधारण गटातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाची मदतीची गरज असते. ही अवजारे त्यांच्यासाठीच मंजूर केलेली होती. त्यासाठी जिल्हानिहाय अनुदानदेखील वाटले गेले आहे. मात्र काही जिल्ह्यात ठेकेदारांनी कृषी विभागाच्या ताब्यात दिलेली अवजारे शेतकऱ्यांना मिळालीच नाहीत,” असे शेट्टी यांनी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास दिले.   

“अवजारांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस व्यवहार झाले आहेत. शेतकऱ्यांना वाटप न करता अनेक वर्षांपासून अवजारे गंजत ठेवण्यात आली. ही बाब निश्‍चितच धक्कादायक आहे. संबंधित अधिकाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कृषी विभागात सावळागोंधळ व बोगसगिरी उघड झालेली आहे. ही अवजारे शेतकऱ्यांसाठी होती, की अधिकारी तसेच ठेकेदारांनी पोसण्यासाठी होती, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे,” अशा शब्दांत शेट्टी यांनी टीकास्त्र सोडले आहे. 

प्रतिमा मलिन होतेय
“बोगस बिले घेऊन अनुदान लाटल्याचे धक्कादायक प्रकार अनेक जिल्ह्यांत घडलेले आहेत. काही ठिकाणी अवजारे चोरीस गेल्याचे अहवालात नमूद केले आहे. या बाबी धक्कादायक असून राज्य शासनाची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. सदर प्रकरणाकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून या प्रकरणाची सखोल तपासणी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई केली जावी. अवजारे वाटपामध्ये पारदर्शकता आणावी,”अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...