मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास केंद्र सरकारविरोधात रान पेटवू : शेट्टी
कोल्हापूर : दोन दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या विरोधात रान पेटवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. १) दिला.
कोल्हापूर : दोन दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या विरोधात रान पेटवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. १) दिला.
दिल्ली येथे देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर पोलिस बळाचा वापर करून अन्याय करत आहेत. याचा निषेध करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘जात’ आणि ‘प्रांतवाद’ देण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन केवळ पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही. तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची निगडित आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल शेट्टी यांनी केला.
शेट्टी यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊन मोठी झटापट उडाली. केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवले. या वेळी मोठी झटापट उडाली. मात्र याला न जुमानता केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या प्रकारामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण होते.
- 1 of 1029
- ››