एकरकमी एफआरपी न दिल्यास आयुक्तालयावर हल्लाबोल

एकरकमी एफआरपी न दिल्यास आयुक्तालयावर हल्लाबोल
एकरकमी एफआरपी न दिल्यास आयुक्तालयावर हल्लाबोल

कोल्हापूर : साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी न दिल्यास २८ जानेवारीस साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. १) येथे दिला. साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी न दिल्याच्या निषेर्धात येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.  खा. शेट्टी म्हणाले, ‘‘हंगाम सुुरू होऊन पन्नास दिवस झाले. तरीही कारखान्यांनी एफआरपी दिली नाही. त्यांच्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने कोणतीही कारवाई केली नाही. शुगर केन कंट्रोल ॲक्‍ट १९६६ नुसार ऊस तुटल्यपासून चौदा दिवसांच्या आत उसाची पहिली उचल विनाकपात एफआरपी देणे बंधनकारक आहे. पण, एकाही कारखान्याने एफआरपी देता येत नाही. आम्हाला एक रक्कमी एफआरपी हवी. कारखाने ऐंशी टक्के एफआरपी देण्यास तयार आहेत. पण आम्ही ती घेणार नाही. तुकड्याने पैसे हाती आल्यास शेतकऱ्याला काही उपयोग होणार नाही. सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. कारखान्यांना ८० टक्के एफआरपी देण्यासाठी सरकार सांगत आहे. आम्ही हे कदापि सहन करणार नाही.  खा. शेट्टी म्हणाले, की ''सरकारचा कावा आम्ही ओळखला आहे. साखर सहसंचालकांनी साखर ताब्यात घेण्याची तयारी करायला हवी, जप्तीची कारवाई व्हायला हवी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. असे झाले नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यासह कोणत्याही मंत्र्याला कुठेही जावून आम्ही जाब विचारू. ऊस उत्पादकाची देणी अगोदर भागवा, जर तुम्हाला टनामागे दोनशे ते तीनशे रुपयांची देणी कमी पडत असतील. तर तुम्ही सरकारचे देणे थांबवा, बॅंकाची देणी थांबवा, शेतकऱ्यांची रक्कम मागे ठेवून कारखानदार सरकार धार्जिणी भूमिका घेणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. तीव्र आंदोलन करू'' या वेळी रविकांत तुपकर, सावकार मादनाईक, सागर संभूशेटे, राम शिंदे, शैलेश चौगुले आदीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com