अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा महसूलमंत्र्यांवर हल्लाबोल 

अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा महसूलमंत्र्यांवर हल्लाबोल 
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा महसूलमंत्र्यांवर हल्लाबोल 

सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍नावर सरकारने तोडगा काढण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांची ताकद या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला समजली. मुंबई काय पाकिस्तानमध्ये आहे काय, असे म्हणणारेच आता दूध दराबाबत तोडगा काढण्याची भाषा करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 'अब आया उंट पहाड के निछे,' असे म्हणत त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका केली.  मुंबईला तीन दिवस पुरेल इतका दूधसाठा केल्याचे सांगणारे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना आता कशी दुधाची टंचाई भासू लागली. साठा केलेले दहा लाख लीटर दूध कोण प्याले, शेतकऱ्यांची ताकद समजली का, शेतकरी त्यांच्या हक्‍कासाठी रस्त्यावर उतरला की काय होते, याची जाणीव झाली ना, असे सवाल खासदार शेट्टी यांनी मंत्री जानकर यांना केले. खासगी दूध संघांवर नियंत्रण नसल्याने ते शेतकऱ्यांना प्रतिलीटर 15 ते 21 रुपये दर देतात तर सहकारी संघांना शासनाने आदेश देऊनही 17 रुपये दर दिला जातोय. दूध भुकटीसाठी लिटरला तीन रुपये व निर्यातीसाठी पुन्हा 50 रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यापेक्षा एक किलो भुकटीसाठी सरकारने 75 ते 80 रुपयांचे अनुदान द्यावे, जेणेकरुन खासगी अथवा सहकारी दूध संघ शेतकऱ्यांना प्रतिलीटर किमान 25 रुपये दर देतील. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलीटर पाच रुपयांचे अनुदान जमा करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चार खासदार शेट्टी यांनी यावेळी केला.  मागील कित्येक वर्षांपासून खासगी व सहकारी दूध संघचालक राज्यातील शेतकऱ्यांना लुटत आहेत. सरकारला त्याची माहिती असूनही नुसती नोटीस देण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे कलई शेतकऱ्यांची आणि मलई मात्र संघचालक खात आहेत, अशी स्थिती निर्माण झाल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com