agriculture news in marathi, raju shetty demands to give a complete loan waiver for farmers, kolhapur, maharashtra | Agrowon

पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके गेलेल्यांना सरसकट कर्जमाफी द्या : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पीक गेलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी; अन्यथा बुधवारी (ता. २८) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पीक गेलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी; अन्यथा बुधवारी (ता. २८) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

कोल्हापुरात मंगळवारी (ता.२०) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, की वीजपंपांची बिले माफ करावीत. कर्जमाफीचे परिपत्रक तत्काळ काढावे, महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णा नदी व उपनद्यांच्या जलाशयाच्या विसर्गाचे नियमन केंद्रीय जल आयोगामार्फत करावे याबरोबरच कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला २५०० हजार कोटी रुपयांचे पॅकेज देऊन राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी आमच्या मागण्या आहेत.

श्री. शेट्टी म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यातील ७५ हजार हेक्‍टरवरील ऊस कुजला आहे. याची नुकसानभरपाई म्हणून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. वास्तविक इतक्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असताना शासन, प्रशासनाला काहीही समजले नाही, हे दुदैवी आहे. १ ऑगस्टला धरणे रिकामी केली असती तर पुराची परिस्थिती ओढवली नसती. या महापुराला प्रशासन जबाबदार आहे. या वेळी प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
यंत्रमागाद्वारे रोजगाराचा प्रश्न सुटेल...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘प्रतिबंधित...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगरमध्ये उद्योग सुरू; पण मजुरांची वानवानगर  ः लॉकडाउन शिथिल करताना केंद्र व राज्य...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...