agriculture news in marathi, Raju Shetty files nomination for location | Agrowon

शक्तिप्रदर्शन करीत भरला राजू शेट्टी यांनी अर्ज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मार्च 2019

कोल्हापूर : कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे कांग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. २८) उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी शेतकरी संघटना व मित्र पक्षाकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, जयंतराव आवळे आदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसह, रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे, जालिंदर पाटील, सावकार मादनाईक आणि स्वाभिमानीचे प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते.

कोल्हापूर : कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे कांग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. २८) उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी शेतकरी संघटना व मित्र पक्षाकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, जयंतराव आवळे आदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसह, रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे, जालिंदर पाटील, सावकार मादनाईक आणि स्वाभिमानीचे प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते.

दुपारी एकच्या सुमारास दसरा चौकातून हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडीत बसून श्री. शेट्टी यांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. या वेळी त्यांच्या विजयाच्या मोठ्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. सजवलेल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व आजी-माजी आमदारांसह पक्षाचे पदाधिकारी, घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी या सर्वांना निमंत्रित करण्यात आल्याने मोठी गर्दी झाली. कोणत्याही परिस्थितीत श्री शेट्टी यांना निवडून आणण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. विविध वक्त्यांनी महायुतीवर मोठे टीकास्त्र सोडले.

महाडिक, सतेज पाटील यांची उपस्थिती
सध्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आहेेत, मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी त्यांचा प्रचार न करण्याचे ठरवले आहे. श्री. शेट्टी यांच्या अर्ज भरतेवेळी मात्र हे दोघे एकत्र दिसले.


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...