Raju Shetty, Hitendra Thakur angry over government
Raju Shetty, Hitendra Thakur angry over government

राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूर सरकारवर नाराज

मुंबई : महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सोमवारी (ता. ३०) झालेल्या मंत्रिमडळ विस्ताराचे निमंत्रणही देण्यात न आल्याने नाराजी दर्शविली आहे. यासह बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनाही निमंत्रण मिळालेले नाही.

सांगली जिल्ह्यात राजू शेट्टी यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. आता त्यांना निमंत्रणही न देण्यात आल्याने नाराजी स्पष्ट झाले आहे. शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्री म्हणून संधी दिल्याने राजू शेट्टी यांच्यावर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी बच्चू कडू वगळता एकही मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही.

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे.

घटक पक्षांना नक्कीच निमंत्रण दिलेलं आहे, शेकापचे एक आमदार आहेत, राजू शेट्टी यांचा एक आमदार असणार आहे. राजू शेट्टी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी इच्छा होती. मात्र, मंत्रिमंडळात संधी मिळत नसेल तरीही इतर वेगळ्या संधी दिल्या जाऊ शकतात. - नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com