कमी हमीभावाविरुध्द जागृती करणारः राजू शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी

सांगली ः केंद्र सरकारने शेती पिकाला हमीभाव मे महिन्यात जाहीर करणे अपेक्षित होते. हमीभाव जाहीर करण्यास एक महिना विलंब केला असून कमी जाहीर केला आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये जागृती करणार असल्याचेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. सांगली येथे सोमवारी (ता. ८) पत्रकार परिषदेते ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने पीक खर्चाच्या दीडपट हमीभावाचे आश्‍वासन दिले. ते आजही पाळले जात नाही. सध्या वजा दर मिळतोय. त्याविरोधात आम्ही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू करीत आहे. वजा भाव मिळणारी पिके अशी- भात-६१८, ज्वारी-९३६, बाजरी-१८४, मक्का-५९५, नाचणी-८९८, तुर- २३२५, मूग-२४९८, उडीद-२४९०, भूईमूग-१४२३, सूर्यफूल-१७२८, कापूस-१७६२ रुपये आदी पिकांच्या किंमत सरकारने ठरवली आहे. हमीभाव ठरवताना उत्पादन खर्चाचा विचार करणे अपेक्षित होते. परंतु, उत्पादन खर्चाचा विचार केलेला नाही. दोन वर्षांपूर्वी शेतीमालाचा हमीभाव दीडपट करण्याची घोषण केली होती. परंतु, या घोषणेचा विसर सरकारला पडला आहे. हमीभावातील असलेल्या फरकाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. याच मुळे शेतकऱ्यांची कर्जे वाढू लागले आहेत. ते पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, मनसेसह आघाडी एकत्रिक लढल्यास भाजप-शिवसेनेला अद्दल घडवू. विधानसभेला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात २४६ तर मुख्यमंत्री म्हणतात २२८ याचा अर्थ आगोदरच सेटिंग करून ठेवले आहे असा संशय आहे. त्यामुळेही विरोधकांमध्ये नाराजी असेल. तरीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवलीच पाहिजे. ईव्हीएम विरोधातही लढा सुरूच ठेवला पाहिजे. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार राहील. ऑगस्टपर्यंत चित्र स्पष्ट न झाल्यास स्वाभिमानी स्वबळावर ४९ विधानसभेच्या जागा लढवेल. त्यात सांगलीतील सर्वही जागा असतील. ‘‘साखर कारखाने अडचणीत येण्यासाठी केंद्र सरकार चुकीचे धोरण जबाबदार आहे. राज्यात सध्या २५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. काही साखर कारखाने पुढील हंगामात दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा घाट घालत आहेत. कारखान्यांकडून याबाबत संमती पत्र घेऊ लागले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संमती पत्र लिहून देऊ नये,’’ असे आवाहन राजू शेट्टी यांनी या वेळी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com