agriculture news in Marathi, Raju Shetty says, gave permission for agri tourism policy, Maharashtra | Agrowon

कृषी पर्यटन धोरणाला तातडीने मंजुरी द्याः राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जुलै 2019

पुणे : शेतमालाला भाव नसल्यामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी सरकारच्या मदतीशिवाय कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत शोधत आहे. मात्र सरकार कृषी पर्यटन धोरणाला मंजुरी देत नाही हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने या धोरणाला मंजुरी द्यावी, अन्यथा कृषी पर्यटन केंद्रामध्ये मंत्र्याला कोंडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. 

महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या (मार्ट) ११ व्या कृषी पर्यटन सोहळ्यात मंगळवारी (ता. २) शेट्टी बोलत होते. 

पुणे : शेतमालाला भाव नसल्यामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी सरकारच्या मदतीशिवाय कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत शोधत आहे. मात्र सरकार कृषी पर्यटन धोरणाला मंजुरी देत नाही हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने या धोरणाला मंजुरी द्यावी, अन्यथा कृषी पर्यटन केंद्रामध्ये मंत्र्याला कोंडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. 

महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या (मार्ट) ११ व्या कृषी पर्यटन सोहळ्यात मंगळवारी (ता. २) शेट्टी बोलत होते. 

या वेळी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, मध्य प्रदेशचे सहकार उपायुक्त प्रेम द्विवेदी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘कृषी पर्यटन हा चांगला कृषीपुरक उद्योग ठरत आहे. यासाठी काही सुविधा आणि सवलती सरकारने देणे गरजेचे आहे. एकीकडे शेतमालाला दर नाही, शेतीपासून शेतकरी दूर चालला असताना, कृषी पर्यटनाच्या माध्यामातून शेतकरी शेतात थांबत आहे. याला सरकारने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ‘मार्ट’च्या वतीने अनेक वर्ष कृषी पर्यटन धोरणाची मागणी होत आहे. मात्र या धोरणाला सरकार मान्यता देत नाही हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने या धोरणाला मंजुरी द्यावी, अन्यथा कृषी पर्यटन केंद्रामध्ये मंत्र्यांना कोंडू. 

डॉ. मुळीक म्हणाले, ‘‘अमेरिकेमध्ये २५० वर्षांपुर्वी कृषी पर्यटन व्यवसाय सुरु झाला आहे. या पर्यटन केंद्रावर पर्यटक आला नाही आणि हा व्यवसाय तोट्यात गेला तर सरकार विमा देऊन त्याची नुकसानभरपाई देते. मात्र अद्याप आपल्याकडे या व्यवसायाबाबत धोरणच नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या धोरणासाठी मी पुढाकार घेण्यास तयार आहे.’’ 
प्रास्ताविक मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी केले.

या कृषी पर्यटन केंद्रांचा गौरव 
तिकोणा कृषी पर्यटन (मुळशी, पुणे), रामकृष्ण आनंदीवन (रत्नागिरी), न्याहारी (नाशिक), वनलक्ष्मी (कराड), सिद्धेश्‍वर (पूर्णगड, रत्नागिरी), किंग्ज व्हिलेज (वर्धा), तर संपतराव पवार (आटपाडी) यांचा जलनायक पुरस्काराने गौरव करण्यात आला. 
 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...