agriculture news in marathi, raju shetty says lack of irrigation in vidarbha, nagpur, maharashtra | Agrowon

सत्ताकेंद्र असूनही विदर्भ तहानलेला ः राजू शेट्टी
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

विदर्भातील संत्रापट्ट्यात पाणी उपलब्ध न झाल्याने हजारो हेक्‍टरवरील बागा जळाल्या आहेत. त्यांना हेक्‍टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे.
- राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

अमरावती  ः राज्याचे सत्ताकेंद्र विदर्भात असताना विदर्भाला सिंचन सुविधांच्या बाबतीत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, गेल्या पाच वर्षांत विदर्भातील सिंचनवाढीसाठी कोणतेच पूरक प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळेच भूजलपातळीत घट झाल्याची टीका माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

वरुड तालुक्‍यातील लोणी येथे आयोजित दुष्काळ, पाणी परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र भुयार, संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोफळे, सयाजी मोरे, दयाल राऊत, वासुदेव पोहरकर, नितीन टेंभे, वासुदेव पोहरकर, हृषीकेश राऊत, सुमीत गुजर, फजलू रहेमान या वेळी उपस्थित होते.

या वेळी श्री. शेट्टी म्हणाले की, विदर्भ सिंचन सुविधांमध्ये पिछाडीवर असल्याच्या मुद्द्यावर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना दोष दिला जातो. परंतु, आता मुख्यमंत्र्यांसह सर्वच महत्त्वाची पदे विदर्भात आहेत. त्यानंतरही सिंचन प्रकल्पांच्या कामांना अपेक्षित गती आलेली नाही. राज्यातील दुष्काळ पुढील पंचवार्षिकमध्ये दूर करण्याच्या गप्पा केल्या जात आहेत. परंतु, विदर्भातील जनतेला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेले हे सरकार राज्याला न्याय देईल का, याबाबत साशंकता आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...